Kumbh Mela

यावर्षी कुंभ साठी ४२०० कोटींचा खर्च केला आहे. काय खरच हा खर्च मागच्या कुंभ मेळाव्यापेक्षा तीन पट जास्त आहे का ?

राष्ट्रीय सामाजिक

सध्या जर कोणत्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमाची चर्चा होत असेल तर ती म्हणजे कुंभ मेळ्याची… अगदीच दोन दिवसांपूर्वी म्हणजे सोमवारी ४ फेब्रुवारीला जगातील सर्वात मोठा एक दिवसीय लोकसंख्या असलेला भूभाग म्हणून कुंभची ओळख समोर आली आहे.

भारतीय धार्मिक परंपरेत कुंभ मेळाव्याला एक विशेष महत्व आहे. दर १२ वर्षांनंतर महाकुंभ मेळाव्याचं आयोजन करण्यात येते. तसेच दर सहा वर्षांनी अर्धकुंभ म्हणजेच कुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. जसे आत्ता उत्तर प्रदेशांत प्रयागराज येथे अर्ध्कुन्भ मेळाव्याचे पर्व सुरु आहे.

कुंभ मेळावा कोणताही असो त्यासाठीची लागणारी तयारी, आणि इतर गोष्टी याची पूर्वतयारी हि आवश्यकच असते. प्रश्न आस आहे कि कुंभ मेळाव्याची खर्चाची गणितच सर्व सामांन्यांच्या कल्पनेपलीकडची आहेत… पण तरीही एक सामान्य नागरिक म्हणून लोकांच्या मनात हा प्रश्न नक्कीच येवू शकतो.

कथन:

कुंभ मेळा २०१९ चा खर्च

https://kumbh.gov.in/

कुंभ बद्दल अनेक वेळा वेगवेगळ्या बातम्या आणि माहिती येत असते. आता यावर्षी कुंभ चा खर्च हा ४२०० कोटी आहे असे समोर आले आहे. हा एवढा खर्च कसा करण्यात येतो याचे सत्य समजून घेण्याचा एक प्रयत्न केला तेव्हा सत्य समोर आले.

aajtak l BBC l Economic Times

तथ्यांचे विश्लेषण:  

कुंभ मेला २०१९ च्या एकूण खर्च या संदर्भात अनेक वेगवेगळ्या वृत्तपत्रांमध्ये आकडेवारी आली आहे. उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या वार्षिक अर्थ संकल्पमध्ये १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या सरकारच्या अर्थ संकल्प व्यतिरिक्त केंद्र सरकार सुद्धा कुंभ मेळाव्यासाठी आर्थिक तरतूद करते. याशियाय अनेक वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनातून कुंभ साठी निधी उपलब्ध होत असतो.

उतर प्रदेश सरकार कडून दिल्या जाणाऱ्या सुविधा येथे बघू शकता.

Kumbh.gov.inBusiness Today

केंद्र  सरकारकडून यावर्षी कुंभ मेळासाठी अर्थ संकल्पमध्ये एकूण २२०० कोटी रुपय्यांची तरतूद केली आहे. त्यापैकी १२०० कोटी रुपये उत्तर प्रदेश सरकारला देण्यात आले असून, बाकीचे पैसे हे देखील टप्प्या टप्प्याने देण्यात येत आहेत. परंतु एका वृत्त संस्थेने दिलेल्या बातमीनुसार उत्तर प्रदेश सरकारने २००० कोटी रुपये कुंभ मेळा २०१९ साठी दिले असल्याची बातमी प्रसिध्द केली आहे. त्यामुळे एकूण आकड्यांचा अभ्यास केला असता आपल्याला उत्तर प्रदेश सरकारने २०१९ च्या कुंभ साठी जवळपास २००० कोटी रुपये दिले आहेत असे म्हणता येईल. तसेच प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्या एका अहवालानुसार २०१३ मध्ये झाल्येल्या कुंभ मेळासाठी १३०० कोटी रुपये खर्च झाला होता. आता या वर्षीचा खर्च हा मागच्या वर्षीच्या कुंभ मेळाव्यापेक्षा तीन पट जास्त आहे.

या संदर्भातील बातमी आपण येथे बघू शकता.

PTI NEWS l Aajtak l Newsfloe

निष्कर्ष : या सर्व अभ्यासानुसार आपण असे निष्कर्ष काढू शकतो की कुंभ मेळा २०१९ साठी ४२०० कोटी रुपय्यांचा खर्च करण्यात येत आहे, हे सत्य आहे. तसेच हा खर्च मागच्या कुंभ मेळापेक्षा तीन पट जास्त आहे.

*फोटो सौजन्य : कुंभ २०१९ व्यवस्थापन समिती , NDTV

Title: यावर्षी कुंभ साठी ४२०० कोटींचा खर्च केला आहे. काय खरच हा खर्च मागच्या कुंभ मेळाव्यापेक्षा तीन पट जास्त आहे का ?

Fact Checked By: Amruta Kale

Result: Real