भारताकडून पुलवामाचा बदला, 3 दहशतवादयांना कंठस्नान

False खोटी न्यूज I Fake News
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

एक लाईक बनतोच यार या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर होत आहे. या व्हिडीओत तीन दहशतवाद्यांना भारतीय लष्करानं कंठस्नान घातल्याचं दाखवण्यात येत आहे. या व्हिडीओला 21,490 Views मिळाले आहेत. हा व्हिडीओ 414 जणांनी शेअर केला आहे. यावर 76 कमेंटस आल्या आहेत.

FB ArchivePost | FB ArchivePost

तथ्य पडताळणी

हा व्हिडीओ 8 फेब्रुवारी 2019 रोजी बिपीन पांडे यांनी अपलोड केल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओची लिंक खाली दिली आहे.

आक्राईव्ह लिंक

लाईव्ह इन्काउंटर बाय इंडियन आर्मी या नावाने हा व्हिडीओ सुरज कोहली यांनी 12 डिसेंबर 2018 रोजीही अपलोड केलेला आहे. हा व्हिडीओ 2693 जणांनी पाहिला आहे.

आक्राईव्ह लिंक

टू आईजने हा व्हिडीओ 13 फेब्रुवारी 2019 रोजी शेअर केला आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

भारताकडून पुलवामाच्या घटनेचा बदला घेण्यात आला आहे. लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. हे वृत्त चुकीचे आहे. हा व्हिडीओ पुलवामाची घटना घडली त्या दिवशीच्या म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 च्या आधीचा आहे. हा व्हिडीओ मुद्दामहून प्रसारित करण्यात येत असल्याचे आमच्या पडताळणीत आढळून आले आहे.

False Title: तथ्य की जांच: क्या आंध्रप्रदेश मे अमित शाह ने जन आभाव मे अपनी जनसभा रद्द की?”
Fact Check By: Dattatray Gholap 
Result: False (हे वृत्त खोटे आहे)

 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •