भाजपच्या बड्या लोकप्रतिनिधीच्या कामक्रीडेचे फोटो व्हायरल : सत्य पडताळणी

Mixture राजकारण | Politics

कथन

सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की भाजपचा एक लोकप्रतिनिधी एका महिलेसोबत कामक्रीडा करत असतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. याबद्दल केलेली सत्य पडताळणी ..

Facebook | अर्काइव्ह

ही बातमी काही वृत्तपत्र आणि वेबसाईटवर दिसून आले आहे.

वृत्तपत्रांमधील बातमी येथे वाचू शकता.
प्रहारअर्काइव्ह | महाबातमीअर्काइव्ह | जनशक्तीअर्काइव्ह

त्याचप्रमाणे काही वेबसाईटवरही याबद्दल पोस्ट आढळून आल्या आहेत.

खाली दिलेल्या लिंकवर आपण सविस्तर वृत्त वाचू शकता…
मराठी जॉब्स  – अर्काइव्ह | एम एच १९अर्काइव्ह | एम एच १९अर्काइव्ह

या संदर्भातील सत्य जाणून घेतांना असे आढळून आले आहे की, वृत्तपत्रांमधील बातम्यांमध्ये भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीचे नाव किंव्हा इतर माहिती दिलेली नाहीये. केवळ एक लोकप्रतिनिधी असे म्हंटले आहे.

सौजन्य : प्रहार
सौजन्य : जनशक्ती

तसेच या संपूर्ण प्रकरणात अजूनपर्यंत कुठेही हे स्पष्टपणे सिध्द झाले नाहीये की, फोटोमधील व्यक्ती ही भाजप पक्षाशी संबधित आहे.  

बातमीतील कथित व्यक्ती ही भाजप पक्षाचाच लोकप्रतिनिधी आहे हे कुठेही सिध्द होत नाही.

निष्कर्ष : भाजपच्या बड्या लोकप्रतिनिधीचे कामक्रीडेचे फोटो व्हायरल या बातमीतील काही बाबींची पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बातमी भ्रामक असल्याचे फॅक्ट क्रिसेन्डोच्या पडताळणीत आढळून आले आहे.

Avatar

Title:भाजपच्या बड्या लोकप्रतिनिधीच्या कामक्रीडेचे फोटो व्हायरल : सत्य पडताळणी

Fact Check By: Amruta Kale 

Result: Mixture