पाकिस्तानला युरोपियन युनियननं केलं ब्लॅक लिस्टेड; सत्य की असत्य

आंतरराष्ट्रीय खरी न्यूज I Real News
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना होणारा अर्थ पुरवठा थांबवण्यासाठी युरोपियन युनियननं पाकिस्तानला ब्लॅक लिस्टेड केले आहे. पाकिस्तानसोबत सौदी अरब, पनामा आणि अमेरिकेतील 4 राज्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. ब्लॅक लिस्टेड केल्यानंतर युरोपियन देश व्यापारी संबंध ठेवत नाहीत. त्यामुळे पाकिस्तानसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. युरोपियन युनियनच्या या निर्णयामुळे कर्ज मिळणं आणि व्यापारामध्ये समस्या निर्माण होतात.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
न्यूज 18 लोकमत
आक्राईव्ह लिंक

फेसबुकवर न्यूज 18 लोकमतच्या या पोस्टला 12 हजार लाईक्स आहेत. या बातमीवर 95 जणांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी 936 जणांनी शेअर केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा रोखण्यासाठी युरोपियन युनियनने पाकिस्तानला काळ्या यादीत टाकल्याचे वृत फर्स्टपोस्टने दिले आहे. ब्रिटननं यावर चिंता व्यक्त केली असल्याचंही फर्स्ट पोस्टनं म्हटलं आहे.

हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

फर्स्टपोस्ट
आक्राईव्ह लिंक

वन इंडिया हिंदीनेही याबाबतचे वृत्त दिले आहे. या निर्णयाचा मोठा फटका पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बसेल असे वन इंडियाने म्हटले आहे. अफगानिस्तान, दक्षिण कोरिया, इथियोपिया, इराण, पाकिस्तान, श्रीलंका, सीरिया, ट्यूनीशिया आणि यमन या देशाचा या यादीत समावेश असल्याचे वन इंडियाने म्हटले आहे.

हे वृत्त सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

वन इंडिया हिंदी
आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

पाकिस्तानला युरोपियन युनियननं ब्लॅक लिस्टेड केल्याचे स्पष्ट होत आहे. मनी लाँड्रिंग आणि दहशतवादी कारवायांना होणारा अर्थ पुरवठा थांबवण्यासाठी युरोपियन युनियननं हे पाऊल उचललं आहे. त्यामुळे फॅक्ट क्रिसेडोने हा निष्कर्ष काढला आहे की हे वृत्त खरं आहे.

Avatar

Title:पाकिस्तानला युरोपियन युनियननं केलं ब्लॅक लिस्टेड; सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •