पाकिस्तानने टाटा सुमोची मोठी ऑर्डर दिली, रतन टाटांनी ती नाकारली? काय आहे सत्य?

False राष्ट्रीय
 • 10
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  10
  Shares

माझे पान नावाच्या फेसबुक पेजने 18 फेब्रुवारी टाकलेल्या पोस्टमध्ये दावा केला आहे की, रतन टाटांनी केंद्रीय व्यापार मंत्र्यांना “तुम्ही निर्लज्ज असू शकता, मी नाही” अशा शब्दांत खडसावत हॉटेल ताजच्या नुतनीकरणाचे टेंडर दोन पाकिस्तानी उद्योगपतींना देण्यास नकार दिला. तसेच पाकिस्तान सरकारने टाटा सुमो खरेदी करण्याची दिलेली मोठी ऑर्डरदेखील रद्द केली. यामागची सत्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली.

माझेपान-अर्काइव्ह

ही पोस्ट शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलो नाही, मराठी स्टेटस, आर एस एस चांदगड तालुका यासह विविध पेज आणि यूजर्सनेदेखील शेयर केली आहे. पडताळणी करेपर्यंत ही पोस्ट 6.4 हजार वेळा शेयर करण्यात आली. तसेच या पोस्टला 29 हजार लाईक्स मिळाल्या असून त्यावर 1.8 हजार कमेंट्स करण्यात आल्या आहेत.

शर्यत अजून संपलेली नाही-अर्काइव्ह | मराठी स्टेटस- अर्काइव्ह | आरएसएस चांदगड तालुका-अर्काइव्ह

तसेच इंग्रजीतूनही अशाच प्रकारच्या पोस्ट शेअर करण्यात आल्या आहेत.

सत्य पडताळणी

दावा क्र. 1 – रतन टाटांनी केंदीय व्यापार मंत्र्यांना खडसावले की, “तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही.”

माझे पान पेजच्या पोस्टनुसार, “केंद्रीय व्यापार मंत्र्याने लगेच रतन टाटा यांना फोन करून विनंती केली की, त्या दोन पाकिस्तानी उद्योगपतींना आपण भेट द्यावी आणि त्यांच्या टेंडरचा आस्थापूर्वक विचार करावा. त्यावर रतन टाटा ताडकन म्हणाले, “तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही”.

अशाच प्रकारच्या इंग्रजी पोस्ट्मध्ये ते केंद्रीय व्यापार मंत्री म्हणून आनंद शर्मा यांच्या नावाचा उल्लेख आहे.

2009 ते 2014 दरम्यान आनंद शर्मा भारताचे केंद्रीय व्यापार मंत्री होते. त्यांनी असा काही रतन टाटांना फोन केला असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

दावा क्र. 2 – पाकिस्तान सरकारने टाटा सुमो खरेदी करण्याची मोठी ऑर्डर दिली आणि ती रतन टाटांनी नाकारली.

फॅक्ट क्रेसेंडोने जेव्हा याविषयी गुगलवर शोध घेतला असता गेल्या सहा-सात वर्षांपासून अशा आशयाच्या बातम्या आणि पोस्ट फिरत असल्याचे समोर आले. PROUD TO BE AN INDIAN

या फेसबुक पेजने 2 ऑगस्ट 2012 रोजी इंग्रजीतून या आशयाची पोस्ट केली होती.

प्राऊड टू बी अन इंडियन फेसबुक-अर्काइव्ह

भारत ऑटोज् या संकेतस्थळाने 8 ऑगस्ट 2012 रोजी “Tata motors had rejected Pakistan’s proposal for supplying 380 nos. Tata Sumo Grande for use of Pakistan police” (टाटा मोटोर्सने पाकिस्तानची त्यांच्या पोलिसांसाठी 308 टाटा सुमो ग्रँडे खरेदी करण्याची ऑर्डर नाकारली) अशी बातमी दिली होती.

परंतु, टाटा मोटर्सने हा दावा खोटा ठरवित तसे भारत ऑटोजला कळविले. त्यानंतर भारत ऑटोजने माफी मागत त्याच दिवशी खुलासा प्रसिद्ध केला. त्यात म्हटले की, “आम्ही ज्या सूत्राच्या आधारे ही बातमी दिली तो खोटा (फेक) असल्याचे निष्पण्ण झाले.” (त्यानंतर ही बातमी काढण्यात आली.)

भारत ऑटोजने टाटा मोटर्सच्या प्रवक्त्याचे म्हणनेदेखील प्रसिद्ध केले. त्यात म्हटले आहे की, ही बातमी चूकीची आहे. टाटा कंपनीला अशी कोणतीही र्डर मिळालेली नाही. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार नियमांनुसार दोन्ही देशांमध्ये वाहनांचा व्यापार निषिद्ध आहे. त्यामुळे पाकिस्तानतर्फे टाटा मोटर्सला वाहन खरेदीची र्डर मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. (यासंबंधी टाटा मोटर्सच्या संकेतस्थळावर कोणतेही प्रेस रिलीज उपलब्ध नाही.)

त्याचबरोबर 16 जुलै 2013 रोजी टाटा मोटर्सच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एका यूजरच्या प्रश्नाला उत्तर देतानादेखील असेच उत्तर देण्यात आले.

ट्विटर अर्काइव्ह

ट्विटर अर्काइव्ह

निष्कर्ष – असत्य

फॅक्ट क्रेसेंडोच्या सत्य पडताळणीमध्ये हे स्पष्ट होते की, रतन टाटांनी केंद्रीय व्यापर मंत्र्यांना “तुम्ही निर्लज्ज असू शकाल, मी नाही” असे म्हटलेले नाही. तसेच पाकिस्तान सरकारने टाटा सुमो खरेदी करण्याची कोणतही मोठी ऑर्डर दिलेली नाही. कारण कारण दोन्ही देशांतील व्यापार नियमांनुसार वाहनांच्या व्यापाराला परवानगीच नाही. त्यामुळे टाटा मोटर्सचा रद्द करण्याचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे ही पोस्ट पूर्णतः असत्य आहे.

Avatar

Title:पाकिस्तानने टाटा सुमोची मोठी ऑर्डर दिली, रतन टाटांनी ती नाकारली? काय आहे सत्य?

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False


 • 10
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  10
  Shares