पनवेलमधील आपटे बस स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली; सत्य की असत्य

सत्य सामाजिक
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  

पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आली आहे. रात्री कर्जत वरून आपट्याला येणारी बस आपटे बस डेपोमध्ये थांबली असताना कंडक्टरला एका पिशवीत काही तरी टाईम बाँब सारखे असल्याचे आढळून आले. या बाबत त्यांनी स्थानिक पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब बाँब शोधक पथकाला कळवले आहे. याबाबत फॅक्ट क्रिसेन्डोने सत्य पडताळणी केली आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

प्रभात पर्व न्यूज आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील एसटी बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळून आल्याचे वृत्त लोकमत न्यूज 18 नेही दिले आहे. रायगड अलिबागहून बॉम्ब स्क्वॉड पथक आपटा इथं रवाना झाले असल्याचेही या वृत्तात म्हटले आहे.

सविस्तर वृत्त वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

लोकमत न्यूज 18 आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष
पनवेलमधील आपटे बस स्थानकावरील बसमध्ये बाँब सदृश्य वस्तू आढळली आहे. रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही या बाबीला दुजोरा दिला आहे. फॅक्ट क्रिसेन्डोने याबाबत केलेल्या पडताळणीत ही बाब सत्य आढळून आली आहे.

Avatar

Title:पनवेलमधील आपटे बस स्थानकावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळली; सत्य की असत्य

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: True


 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •