भोपाळमधील जंबूरी मैदानावर 8 फेब्रवारी रोजी काँग्रेसने आभार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ उपस्थित होते. कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर जिल्हा काँग्रेस कमिटीने एक तंबू उभारला होता. याठिकाणी येणाऱ्या बसमधील लोकांना थांबवून बिअर वाटली जात होती. या बसेस कार्यक्रमासाठीच येत होत्या. अशी बातमी प्रसारमाध्यमांकडून चालविण्यात येत आहे.

याच बातमीला आपण खाली दिलेल्या लिंकवर सविस्तर वाचू शकता
लोकमत
आर्काईव्ह पोस्ट

फेसबुकवर या बातमीला दोन हजार सातशे जणांनी लाईक केलं आहे. तर 172 जणांनी यावर कमेंट केली आहे. ही बातमी 643 जणांनी शेअर केली आहे.

आर्काईव्ह फेसबुक पोस्ट

ही बातमी खालील संकेतस्थळांवरही आहे
The Lallantop

द ललंनटॉपने या बातमीत कमलनाथ यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमासोबत एक फोटो जोडला आहे. हा फोटो बियरच्या बॉटल्सचा आहे.

द ललंनटॉपच्या बातमीला 350 लाईक असून 43 जणांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही बातमी 198 जणांनी शेअर केली आहे. तब्बल 27 हजार जणांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

https://www.thelallantop.com/videos/madhya-pradesh-congress-workers-allegedly-distributing-beer-in-bhopal-before-rally-of-congress-president-rahul-gandhi/

पत्रिकाने याबाबतचे वृत्त सगळ्यात अगोदर दिले होते.
Patrika | Archive
पत्रकार देवराज दुबे यांच्या फेसबुक पेजवरही याबाबतचे व्हिडीओ उपलब्ध आहेत.

तथ्य पडताळणी

हा फोटो गुगल रिव्हर्स सर्चने पाहिला असता तो उत्तर प्रदेशातील जोनपूर येथील आहे. तेथे अवैध दारुच्या अड्डयावर छापा टाकल्यानंतरचा हा फोटो आहे. आज तकने हा फोटो 23 ऑगस्ट 2018 रोजी आपल्या संकेतस्थळावरील बातमीत वापरला आहे.

ही बातमी सविस्तरपणे वाचण्यासाठी इंडिया टूडेच्या या लिंकवर क्लिक करा.
इंडिया टूडे

काँग्रेसने राहुल गांधींच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी बियर वाटल्याचे सांगण्यात येतंय. या बॉक्समध्ये खाद्यपदार्थ होते, असे काँग्रेसनं याबाबत म्हटलंय.

यात विरोधकांचा हात असू शकतो तसेच वृत्तात तथ्य असल्यास कारवाई करणार असल्याचंही काँग्रेसनं स्पष्ट केलंय. या बॉक्समध्ये नेमकं काय आहे हे स्पष्टपणे दिसून येत नाही. सर्व व्हिडीओमध्ये कारचा क्रमांक (एमपी 22 सीए 2858) दिसून येत आहे. येथील बॅनरवर जिल्हा काँग्रेस कमिटी, सिवनी आणि अध्यक्ष राजकुमार खुराना असे लिहिलेले आहे. पोलिसांनीही आपण घटनास्थळी पोहचलो तेव्हा तंबु हटविण्यात आला होता, असं सांगितलंय. ही घटना सभा सुरु असताना घडली की अगोदर याबाबत वेगवेगळे दावे आहेत. मध्य प्रदेशातील एका न्यूज पोर्टलनेही ही बियर वाटण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं म्हटलंय.

DailyNewsMP

निष्कर्ष

या व्हिडीओतील बॉक्समध्ये बियरच होती, असं स्पष्टपणे म्हणता येत नाही. हे बॉक्स उलटे ठेवले आहेत. द्रव पदार्थ असल्यास शक्यतो अशा पध्दतीने बॉक्स ठेवण्यात येत नाहीत. व्हिडीओ दिसणा-या कारवर काँग्रेसचा झेंडा आहे. तसेच ही कार काँग्रेसच्या सिवनी जिल्हाध्यक्षांची असल्याचं दिसतंय. पण बियरच वाटण्यात आली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी सत्य असल्याचं म्हणता येत नाही. या ठिकाणी कोणी बियर पीत असल्याचंही व्हिडीओत आणि फोटोत दिसत नाही. बातमीचे शीषर्क आणि खाली देण्यात आलेल्या माहितीतही काहीशी विसंगती असल्याचेही आम्ही निदर्शनास आणून देत आहेत. जेव्हा फॅक्ट क्रिसेडोशी बोलताना काँग्रेसचे सिवनी जिल्हाध्यक्ष राजकुमार खुराणा आणि युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद पंचवाणी म्हणाले की, बियर वाटल्याचे चूक आहे. या बॉक्समध्ये खाद्यपदार्थ होते. ते रॅलीसाठी 50 बसमधून नागपूर आणि धोलपूरच्या भागातून आलेल्यांना देण्यात आले. ते एका केटररने बनवले होते.

MixtureTitle: तथ्य पडताळणी: राहुल गांधींची सभा सुरू असताना बाजूलाच वाटली जात होती बिअर"
Fact Check By: Dattatray Gholap
Result: Mixture