कोणत्याही एटीएम मधून पैसे काढताना जर एखादी फाटकी नोट आली तर, ऐनवेळी तशी नोट कोणी स्वीकारत नाही. त्यामुळे पैसे असूनही पैसे नसल्याचा भास होतो. जर फाटकी नोट आली तर नेमके काय करायचे ?

कथन

जर कधी एटीएम मधून फाटकी नोट आली तर, अशा वेळी तशी फाटकी नोट घेऊन आपण परत एटीएम  मध्ये तर परत नोट टाकू शकत नाही ना. त्यामुळे अशी फाटकी नोट परत बँकेला देवू शकतो का?

Khasre l bobhata l

तथ्य पडताळणी

आर बी आय म्हणजेच भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया कडून ज्या ग्राहकांना एटीएम मधून जर एखादी फाटकी नोट आली तर तशी नोट जवळच्या बँकेत जमा करू शकतात, असा नियम आहे. त्या बदल्यात बँक त्या व्यक्तीला नोट बदलून देवू शकते.

Inmarathi l

https://www.inmarathi.com/what-to-do-with-torn-notes/

ग्राहकांसाठी अशी सोय आरबीआयकडून करण्यात आली आहे. आरबीआयच्या नियमानुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या किंवा चुगरळलेल्या नोटा स्वीकाराव्या लागतील. त्यामुळे आपण सहजपणे जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन आपली नोट बदलू शकता. यासाठी कोणताही शुल्क लागत नाही. आणि बँक आलेल्या ग्राहकाला फाटकी नोट बदलून देणे नाकारू शकत नाही असे आरबीआय २०१७ च्या नियमावलीत नमूद केले आहे.

Rbi l Lokmat l

निष्कर्ष :
जर कोणाला फाटकी नोट एटीएम मधून आली तर आपण जवळच्या बँक शाखेत जावून नोट बदलून घेवू शकतो. त्यामुळे फाटकी नोट आली तर बँक आपल्याला बँक नोट बदलून देते. हे तथ्य सत्य आहे.

RealTitle: तथ्य पडताळणी : फाटकी नोट आली तर बँक परत घेते का ?"
Fact Check By: Amruta Kale
Result: Real