एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही पोलिस इमरान खान यांना घेऊन जाताना दिसत आहेत ज्यांना दुखापत झालेली आहे असे दिसते आणि असा दावा केला जात आहे कि त्यांच्या घरामध्ये त्यांना मारहाण करण्यात आलेली आहे.

आंतरराष्ट्रीय | International

पोस्ट मध्ये लिहिण्यात आले आहे कि” इमरान खान यांना त्यांच्या घरी मारहाण करण्यात आली,  आणि ते गंभीर जखमी झाले”

अशा प्रकारच्या कमेंट्स आणि ट्विटस हे ट्विटर तसेच व्हॉटसअॅप वर फिरत आहेत

हा व्हिडिओ 2013 मधील असून 5 वर्षे जुना आहे जिथे एका मोहिमेमध्ये ते स्टेज वरून घसरले होते.

द टेलिग्राफ ने 7 मे 2013 रोजी या कमेंट सोबत एक व्हिडिओ अपलोड केला कि “एका निवडणूक रॅलीसाठी स्टेजवर त्यांना घेऊन जाणारी लिफ्ट पडल्या नंतर पाकिस्तानी क्रिकेटर ते राजकारणी बनलेल्या  इमरान खान यांना डोक्यावर दुखापत झाली आणि नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे त्यांच्या पार्टीने सांगितले”

पाकिस्तानी वृत्तपत्र द गार्डियन यांनी देखील असे म्हटले आहे:

पाकिस्तान चे माजी क्रिकेट कर्णधार आणि देशातील सार्वजनिक निवडणुकीमधील अग्रगण्य उमेदवार इमरान खान यांना मंगळवारी त्यांच्या मोहिमेदरम्यान त्यांच्या अंतिम रॅली मध्ये हाइड्रोलिक लिफ्ट पडल्यामुळे डोक्यामध्ये फ्रॅक्चर आणि पाठीवर दुखापत झाल्यामुळे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आहे.

टेलिव्हिजन वरील फोटोमध्ये दाखविण्यात आले आहे कि, पाकिस्तान च्या तहरीक-ए-इंसाफ पार्टी (पीटीआय) चे नेता 60 वर्षीय इमरान खान जे शनिवारी निवडणुकीच्या आधी लाहोर मध्ये प्रचार करत होते, त्या वेळी लोकांनी गच्च भरलेले स्टेज पडले आणि त्यांच्या एका रक्षकाने संतुलन गमावले आणि सर्व लोक चार मीटर च्या उंचीवरून खाली पडले.

इमरान खान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना स्टेज वर घेऊन जाणाऱ्या एका लहान लिफ्ट ला त्यांनी घट्ट पकडलेले होते, तेव्हाच एका व्यक्तीने त्यावर चढण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न केला.

द गार्डियन मधील लेख या वास्तविक घटनेचे वर्णन करत आहे जिथून हा फोटो घेण्यात आला होता.

हा 2013 मध्ये प्रचारा दरम्यान इमरान खान सोबत घडलेल्या वास्तविक दुर्घटनेचा जुना व्हिडिओ आहे, ज्याला अलीकडेच घडलेली घटना म्हणून प्रक्षेपित केले जात आहे. हि खोटी न्यूज आहे आणि त्यांना कुणीही मारहाण करण्यासोबत याचा काहीही संबंध नाही.