
एका सोसायटीमध्ये काही लोक हातात भगवा झेंडा घेऊन ‘जय श्री राम’ गीत गातात आणि मतदारांना राष्ट्रवाद लक्षात ठेऊन मतदान करा असे सांगतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ महाराष्ट्रातीला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील संबंधित नाही.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडओमध्ये एका सोसायटीमधील इमारतीच्या बालकनीमधून लोक ‘जय श्री राम’ गीत गाताना दिसतात. गाणे संपल्यावर इमारतीच्या पायथ्याशी काही लोक भगवा झेंडा घेऊन लोकांना सांगतात की, “येत्या 20 तारखेला राष्ट्रवाद लक्षात ठेऊन मतदान करा.”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हा व्हिडिओ महाराष्ट्राचा आहे.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे.
विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल प्रखण्ड बाँसखोह नामक फेसबुक पेजने हाच व्हिडिओ 15 फेब्रुवारी 2022 रोजी शेअर केला होता.
व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “प्रभात फेरी, कानपूर पश्चिम. जय श्री रामच्या घोषणांनी समाज दुमदुमला!”
हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर अभिषेक सिंह चौहान नामक फेसबुक युजरने 12 फेब्रुवारी 2022 रोजी सदरील व्हिडिओमधील प्रभात फेरीचे फोटो शेअर केले होते.
कॅप्शनमध्ये माहिती सांगितली की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दैनिक प्रभातफेरीच्या 14 व्या दिना निमित्त नवशीलधाम सोसायटी, कल्याणपूरच्या गौतम नगर अंतर्गत विविध अपार्टमेंटमध्ये प्रभातफेरी काढण्यात आली. रतन ऑर्बिट अपार्टमेंट, कान्हा श्याम अपार्टमेंट, डिव्हिनिटी होम अपार्टमेंट, गुलमोहर अपार्टमेंट, इम्पीरियल हाईट अपार्टमेंट आणि इंदिरा नगर आदी ठिकाणी प्रभात फेरी काढण्यात आली.”
खालील पोस्टमध्ये आपण व्हायरल व्हिडिओ आणि इमारतीचे फोटो पाहू शकता.
पुढे डिविनिटी होम्स कानपूर या फेसबुक पेजवर व्हायरल व्हिडिओ आणि त्याप्रमाणे इतर क्लिप आढळल्या.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर लक्षात येते की, व्हायरल व्हिडिओ, डिविनिटी होम्स फेसबुक पेजवरील फोटो आणि गुगल मॅपवरील इमारतीचा फोटो एकच आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा असून महाराष्ट्राशी संबंधित नाही.
2022 मध्ये आरएसएस द्वारे कानपूरच्या डिविनिटी होम्स अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये हा व्हिडिओ काढण्यात आला होता.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:सोसायटीमध्ये ‘जय श्री राम’ गीत गाऊन लोकांना मतदान करण्यास सांगणारा व्हिडिओ महाराष्ट्रातील नाही
Written By: Sagar RawateResult: Misleading
