आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही असा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमतचे ग्राफिक कार्ड वापरून दावा केला जात आहे की, काँग्रेसच्या दबावानंतर आदित्य ठाकरेंनी वरळीतून माघार घेतली असून ते निवडणूक लढवणार नाही.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल बातमी लोकमतने जारी केली नाही. तसेच आदित्य ठाकरेंनी अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

काय आहे दावा ?

आदित्य ठाकरेंचा फोटो आणि लोकमतचा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही; काँग्रेसच्या दबावानंतर आदित्य ठाकरेंची वरळीतून माघार !”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आदित्य ठाकरेंनी अशी घोषणा केले असती तर ही नक्कीच मोठी बातमी ठरली असती. परंतु, अशी बातमी कुठेच आढळली नाही.

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, लोकमतने हे ग्राफिक क्रार्ड जारी केलेले नाही.

लोकमतने 19 ऑक्टोबर रोजी फोसबुक व ट्विटर पेजवर हे ग्राफिक फेक असून त्याच्या कडून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.

पोस्टमध्ये लिहिले होते की, “सदर क्रिएटिव्ह (ग्राफिक कार्ड) लोकमतने तयार केलेलं नाही. ‘लोकमत’चं नाव आणि लोगो वापरुन दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. या खोडसाळपणाची तक्रार आम्ही ‘सायबर क्राइम’कडे करत आहोत.”

आदित्य ठाकरे

माध्यमांवरील बातमीनुसार आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शन करणार वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार असून त्या वेळी महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेले ग्राफिक कार्ड फेक असून लोकमतने जारी केलेले नाही. आदित्य ठाकरे 24 ऑक्टोबर रोजी वरळी मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. खोट्या दाव्यासह हे ग्राफिक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार नाही असा खोटा दावा व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: False