राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचा जुना व्हिडिओ एडिट करुन चुकीच्या संदर्भात व्हायरल

Altered राजकीय | Political

विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभुमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये शरद पवार मुस्लिम समुदायातील लोकांसोबत दिसतात. व्हिडिओमध्ये एक आवाज मुस्लिम समुदायाला मतदान करायला सांगतो.

व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की, शरद पवार यांनी मुस्लिम समुदायाला त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील क्लिप आणि ऑडियो वेगवेगळे असून त्यांचा परस्पर काही संबंध नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये शरद पवार मुस्लिम समुदायासोबत मंचावर दिसतात.

आवाज एकू येते की, “मतदानाच्या काही दिवसांपूर्वी आपण गट तयार करु. आपल्या परिसरातील मतदान केंद्राचे प्रमुख व्हा आणि आसपासच्या मतदान करणाऱ्या स्त्री-पुरुषाला सन्मानाने मतदान केंद्रावर घेऊन जा. इन्शाअल्लाह ते मतदान करतील. या निवडणुकीचा निकाल जर चुकीचा निघाला तर अत्याचाराच्या नद्या वाहतील, नरसंहार घडतील, तुरुंग लहान होतील आणि आणखी काय होईल हे अल्लाह जाणतो.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की,“देशद्रोही मुस्लिमांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) यांना विजयी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम शरद पवारांनी अशी कोणती घोषणा केली असती तर ही एक लक्षवेधी बातमी ठरली असती. परंतु, अशी बातमी अधिकृत माध्यमांवर आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 महिन्यांपूर्वीचा आहे.

द लिडर हिंदी नामक युट्यूब चॅनलने 31 मार्च रोजी व्हायरल व्हिडिओमधील कार्यक्रमाचा व्हिडिओ शेअर केला होता.

हा कार्यक्रम मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे झाला जेथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने इफ्तार पार्टी आयोजित केली होती.

पण यामध्ये कुठेही व्हायरल व्हिडिओप्रमाणे आवाहन ऐकू येत नाही.

सदरील माहितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर आम आदमी पार्टी मुंबईचे अधिकृत ट्विटर हँडलवरदेखील याच कार्यक्रमाचे फोटो शेअर करण्यात आले.

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 6 महिन्यापूर्वीचा असून एडिट केलेला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी मुस्लिम समुदायाला त्यांना मतदान करण्याचे आवाहन केले नव्हते.

मग हा ओडियो कुठला आहे ?

व्हायरल व्हिडिओमधील किव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, इस्लामिक स्कॉलर आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते सज्जाद नोमानी यांचा हा आवाज आहे.

सज्जाद नोमानी यांनी 28 मार्च रोजी आपल्या अधिकृत युट्यूब चॅनलवर स्वत:चा एक व्हिडिओ शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये 1:12 मिनिटावर सज्जाद नोमानी यांनी व्हायरल व्हिडिओमधील भाग एकू शकतो.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओमधील एडिटेड असून वेगवेगळे क्लिप व ओडियो एकत्र करुन खोट्या दाव्यासह पसरवला जात आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार यांनी मुस्लिम समुदायाला त्यांना मतदान करण्याचे आवाहन करत नाही.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:राष्ट्रवादी काँग्रेसच्या इफ्तार पार्टीचा जुना व्हिडिओ एडिट करुन चुकीच्या संदर्भात व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Altered