गुजरात विमान अपघात म्हणून राजस्थानमधील आगीचा व्हिडिओ व्हायरल

False Social

गुजरातमधील अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला आणि 242 प्रवाशांचा पैकी एकच वाचू शकला. याच पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अग्निशमन दलाचे वाहने आग लागलेल्या ठिकाणी जाताना दिसतात. दावा केला जात आहे की, व्हायरल व्हिडिओ अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ गुजरातचा नसून राजस्थानचा आहे.

काय आहे दावा ? 

व्हायरल व्हिडिओमध्ये एका ठिकाणी लागलेल्या आगेतून धुराचे लोट निघताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अहमदाबाद विमान दुर्घटनेचा लाईव्ह थरार.” 

मूळ – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघाताशी संबंधित नाही.

रोहतक हलचल नामक पेजने 9 मे रोजी हाच व्हिडिओ फेसबुकवर शेअर केल्याचे आढळले. कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हनुमानगडमधील अ‍ॅसिड कारखान्यात भीषण आग असून दोन कामगार जिवंत जाळले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तसेच व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या वाहनावरचा नंबर राजस्थान दिसतो आणि वाहनावर ‘अग्निशमन सेवा राजस्थान’ लिहिलेले दिसते.

हा धागा पकडून सदरील महितीच्या आधारे अधिक सर्च केल्यावर कळाले की, राजस्थानमधील हनुमानगड भागात 8 मे रोजी एका रासायनिक कारखान्यात आग लागली होती, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला होता. अधिक महिती येथेयेथे वाचू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ गुजरातमधील विमान दुर्घटनेचा नाही. ही आगीची घटना राजस्थानमधील हनुमानगड येथील घडली होती. खोट्या दाव्यासह जुना असंबंधित व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:गुजरात विमान अपघात म्हणून राजस्थानमधील आगीचा व्हिडिओ व्हायरल

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *