अग्निकुंडावर झोपणाऱ्या साधूचा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नाही; वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

एका साधूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो संन्यासी एका अग्निकुंडावर झोपतो आणि बराच वेळ पडून राहतो. दावा केला जात आहे की, “महाकुंभमधील एका साधूने गंगेत स्नान करण्यापूर्वी अग्निस्नान केले.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ कुंभमेळ्यातील साधूचा नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, एक साधू अग्निकुंडावर झोपतो आणि तरीदेखील तो जळत नाही.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “प्रयागराज महाकुंभ-2025 साठी आलेल्या सिद्ध संतांना गंगेत स्नान करण्यापूर्वी अग्निस्नान करताना पाहून बीबीसीच्या पत्रकाराची झोप उडाली. बीबीसीने काल आपल्या वाहिनीवरून त्याचे प्रसारण केले.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हर्ड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ महाकुंभचा नाही.

इंडियन डिव्हाइन नामक युट्यूब चॅनलने 8 जुलै 2008 रोजी व्हायरल व्हिडिओशी मिळतीजुळती एक क्लिप शेअर केली होती.

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “तंजोरचे अग्नि योगी.”

या व्हिडिओचे वर्णन करताना लिहिले आहे की, हा व्हिडिओ ‘फायर बाबा’वर बनवलेल्या माहितीपटाच्या ट्रेलरचा आहे.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओमधील फायर बाबाचे नाव योगी रामभव असून ते तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. या योगीने गेल्या 45 वर्षात एकूण 1000 दिवस हा अग्निविधी केला आहे. फक्त 43 किलो वजनाचा हा योगी गेल्या 28 वर्षांपासून फक्त दोन केळी, एक ग्लास दूध आणि दिवसातून दोनदा काही थेंब पाणी पिऊन जगला आहे.

मूळ पोस्ट – वर्ल्ड कएट 

आजतकच्या युट्यूब चॅनलवर काही एक्सपर्ट्सनी सांगितले की, “व्हिडिओमधील योगी आपल्या शरीराचा आगेशी थेट संपर्क होऊ नये यासाठी कपड्यांवर रसायने लावून आणि अनेक वर्षा सराव करुन शरीराला प्रशिक्षण केले, या करणामुळे ते आगेत जळत नाही.”

खालील व्हिडिओमध्ये आपण आजतकने 2017 मध्ये तंजोर अग्नियोगी रामभाऊ स्वामीवर केलेली बातमी पाहू शकता.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ तामिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यातील एका साधुवर बनवलेल्या माहितीपटाचा असून महा कुंभमेळ्याशी संबंधित नाही. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:अग्निकुंडावर झोपणाऱ्या साधूचा व्हिडिओ महाकुंभ मेळ्यातील नाही; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading