छावा चित्रपटावर बंदी घालण्यासाठी एनसीपी समर्थक उपोषण करत आहेत का ? वाचा सत्य

False Social

छत्रपती संभाजी महाराजांवर आधारीत ‘छावा’ चित्रपट 14 फेब्रुवारीपासून प्रदर्शित झाला आहे. याच पार्श्वभूमीवर एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दावा केला जात आहे की, “छावा चित्रपटवर बंदी घालण्यासाठी एनसीपी (राष्टवादी कॉंग्रेस) समर्थक उपोषण करत आहेत.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हायरल दाव्यासह हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो 11 वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल फोटोमध्ये काही लोक बसलेले दिसतात आणि त्यांच्या मागे पोस्टरमध्ये लिहिले आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अल्पसंख्याक विभाग, सुफी संत आलमगीर बादशाह औरंगजेब की शान मे गुस्ताकी ना काबिसे बरदाश्त ! औरंगजेब नावाचे चित्रपटाचे नावात बदल करुन; वादग्रस्त वाक्य काढून टाकावे !”

युजर्स हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “छावा चित्रपट बंदी घाला आणि औरंगजेब संत होता असे सांगत उपोषण करणाऱ्या एनसीपी चा निषेध.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर छावा चित्रपटवर बंदी घालण्यासाठी निदर्श केल्याचे कोणत्याही अधिकृत माध्यावर आढळत नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो 11 वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

मूळ – गुगल सर्च

भारत अनटोल्ड स्टोरी वर्ड प्रेस वेबसाईटने 24 जुलै 2013 रोजी हाच फोटो शेअर केल्याचे आढळले.

या बातमीनुसार फोटोमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये (छत्रपती संभाजीनगर) भारतीय मुस्लिमांचा एक गट आगामी बॉलिवूड चित्रपट ‘औरंगजेब’ च्या शीर्षकाविरुद्ध निदर्शने करताना दिसतात. अधिक माहिती येथे वाचू शकता.

मूळ पोस्ट – भारत अनटोल्ड स्टोरी | आर्काइव्ह

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल फोटो 11 वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. छावा चित्रपटवर बंदी घालण्यासाठी निदर्श केल्याचे कोणत्याही अधिकृत माध्यावर आढळत नाही. खोट्या दाव्यासह हा फोटो व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:छावा चित्रपटावर बंदी घालण्यासाठी एनसीपी समर्थक उपोषण करत आहेत का ? वाचा सत्य

Fact Check By: SAGAR RAWATE 

Result: False