हाँगकाँगमधील असंबंधित व्हिडिओ इराणचा इस्रायलवरचा हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

False राजकीय | Political

फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यानंतर आखातीदेशांमध्ये तणाव वाढला आहे. त्याला उत्तर म्हणून इराणकडूनही इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले झाले. याच पार्श्वभूमीवर इमारतींना लागलेली आग आणि अग्निशामक दलाच्या गाड्या दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, की हा व्हिडिओ इराणने इस्रायलमधील तेल अवीवर केलेल्या हल्ल्याचा आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ इराण – इस्रायल युद्धाशी काहीही संबंध नाही.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये काही इमारतींना भीषण आग लागलेली दिसते. 

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इराणच्या हल्ल्यामुळे इस्रायलमधील तेल अवीव शहरात प्रचंड स्फोट झाले, ज्यामुळे इस्रायली शहरे हादरली.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी –

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ इराण- इस्रायल युद्धाशी संबंधित नाही.

हाँगकाँगमधील एका मीडिया आउटलेटच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ 26 नोव्हेंबर 2025 रोजी अपलोड केलेला आढळला. 

कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “हा व्हिडिओ हाँगकाँगच्या ‘ताई पो’ येथील ‘वांग फुक कोर्ट’मध्ये लागलेल्या आगीचा आहे. रात्री ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि अनेक इमारती या आगीच्या तावडीत सापडल्या होत्या. तसेच इमारतीच्या वरील मजल्यांवरून स्फोटांचे आवाजही येत होते.”

पुढील अधिक तपासात आम्हाला साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या यूट्यूब चॅनलवर 1 डिसेंबर 2025 रोजी शेअर केलेला व्हिडिओ मिळाला. त्यातही याच घटनेचे दृश्य दिसतात. अहवालानुसार, ही हाँगकाँगमधील मोठी आग होती. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जखमी झाले होते.

तसेच बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या आगीत सुमारे 168 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी 30 पेक्षा जास्त लोकांना अटक केली होती. अधिक महिती येथे व येथे 

याशिवाय, पुढील तपासात आम्हाला अशा अनेक मीडिया रिपोर्ट्स मिळाल्या ज्यातून स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ हाँगकाँगमधील वांग फुक कोर्टचाच आहे. या सर्व बातम्या नोव्हेंबर 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या आहेत.

निष्कर्ष –

व्हायरल व्हिडिओसोबत केलेला दावा चुकीचा आहे. हा व्हिडिओ तेल अवीवचा नसून नोव्हेंबर 2025 मध्ये हाँगकाँगमध्ये लागलेल्या आगीचा आहे. त्याला सध्याच्या इराण-इस्रायल संघर्षाशी जोडून चुकीची माहिती पसरवली जात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: हाँगकाँगमधील असंबंधित व्हिडिओ इराणचा इस्रायलवरचा हल्ला म्हणून व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *