
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर या दुर्घटनेचे व्हिडिओ म्हणून अनेक क्लिप्स सोशल मीडियावर शेयर होत आहेत.
विमानाच्या कॉकपिटमधून चित्रित केलेला अशाच एका अपघाताच्या व्हिडिओसोबत अजित पवार यांचा शेवटचा व्हिडिओ म्हणून दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 2013 पासून सोशल मीडियावर असून जुना व्हिडिओ अजित पवार विमान अपघाताशी जोडला जात आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवले आहे की, “दाट धुक्यामुळे विमानाच्या कॉकपिटमधून धावपट्टी दिसेनासी होते.”
व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले आहे की, “बारामती विमान अपघात होण्याआधीचा व्हिडिओ समोर, लँडिंग करण्या आगोदरच 3 सेकंद रनवे गायब…”
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये प्रश्न विचारतात की, “बारामती विमान अपघात होण्याआगोदर काय घडलं?”
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर काळाले की, व्हायरल व्हिडिओ 2013 पासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
डग्लेससो नामक युट्यूब चॅनलने हाच व्हिडिओ 12 जून 2013 रोजी शेअर केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मुसळधार पावसात बोईंग बिझनेस जेट फिरत आहे.”
नेमक घडले काय होते ?
सीएनटीसी नेटवर्क न्यूजने 15 जून 2013 रोजी हाच व्हिडिओ आपल्या वेबसाईटवर शेअर करत घटनेची सविस्तर महिती दिली की, “जोरदार पावसात एक बोईंग बिझनेस जेट धावपट्टीकडे उतरत होतं. सुरुवातीला धावपट्टी स्पष्ट दिसत होती, पण जमिनीपासून सुमारे 200 फूट उंचीवर पोहोचताच अचानक मुसळधार पावसामुळे पूर्ण दृश्यता गायब झाली. अशा वेळी नियमांनुसार पायलटांनी लगेच लँडिंग थांबवून विमान पुन्हा वर नेलं, ज्याला “गो-अराउंड” म्हणतात. नंतर हवामान सुधारल्यावर विमानाने सुरक्षितपणे लँडिंग केलं. या घटनेतून दिसतं की दृश्यता कमी झाली तर पायलट लगेच लँडिंग रद्द करून पुन्हा प्रयत्न करतात, ज्यामुळे प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित होते.”

मूळ पोस्ट – सीएनटीसी नेटवर्क
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अजित पवार यांच्या विमानाच्या अपघातापूर्वीचे दृष्य दर्शवत नाही. मुळात हा व्हिडिओ 2013 सालच्या बोईंग बिझनेस जेट लॅंडिंगचा आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामव ट्विटरयेथे फॉलो करा.)
Title:अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वीचे दृष्य म्हणून जुना व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: False


