
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीचा हाताचा पंजा दाखवतानाचा फोटो व्हायरल होत आहे. सोबत दावा केला जात आहे की, महेंद्र सिंह धोनीने पंजा अर्थातच काँग्रेसला मतदान करण्यासाठी आवाहन केले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो लोकसभा निवडणुकीशी संबंधित नाही. चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर 60 लाख फॉलोअर्स टप्पा पार केल्यानंतर धोनीने हा फोटो काढला होता.
काय आहे दावा ?
व्हायरल फोटोमध्ये महेंद्र सिंह धोनी पंजा आणि एक बोट दाखवत आहे. युजर्स हा फोटो धोनी मतदान करून आल्यानंतर काढल्याचे समजून कॅप्शनमध्ये लिहितात की, “धोनी पण सांगतोय पंजा लाच मतदान करा.”

मूळ पोस्ट – फेसबुक
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे.
एनडीटीव्हीने हाच फोटो आपल्या वेबसाईटवर 5 ऑक्टोबर 2020 रोजी अपलोड केला होता.
फोटोसोबत बातमी दिली होती की, “चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर 60 लाख फॉलोअर्सचा आकडा पार केला असून टीमने आनंद साजरा केला.”

चेन्नई सुपर किंग्सने हाच फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर शेअर केला होता.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटोमध्ये महेंद्र सिंह धोनी यांचा काँग्रेसला मतदान करा असे आवाहन करीत नव्हता. चेन्नई सुपर किंग्सने 2020 साली ट्विटरवर 60 लाख फॉलोअर्सचा आकडा पार केल्याचे धोनी दर्शवत आहे. चुकीच्या दाव्यासह हा फोटो शेअर केला जात आहे.
तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:महेंद्र सिंह धोनीने पंजा दाखवत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले का? वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
