
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागत आहे. या पार्श्वभूमीवर दावा केला जात आहे की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून पराभूत झाले.”
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा दावा आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा खोटा आहे. आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून विजयी ठरले.
काय आहे दावा ?
व्हायरल पोस्टमध्ये महाराष्ट्र टाइम्सचा लोगो आणि रोहित पवार यांचा आश्रू अनावर झाल्याचा फोटो दाखला आहे. सोबत ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “भर सभेत रोहित पवार रडले.”
ही पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “रोहित पवार कर्जत जामखेड मधून पराभूत !”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च केल्यावर माध्यमांवर अशी कोणती बातमी आढळली नाही.
तसेच निवडणूक आयोगच्या वेबसाईटवर निकाल पाहिल्यावर लक्षात येते की, कर्जत जामखेड मतदारसंघामधून रोहित पवार यांनी 1,27,676 (+1,243) मतांनी विजय मिळवला आहे.
मूळ पोस्ट – निवडणूक आयोग
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल होत असलेला दावा खोटा आहे. कर्जत जामखेड मतदारसंघामधून रोहित पवार यांनी 1,27,676 (+1,243) मतांनी विजय मिळवला आहे. खोट्या दाव्यासह व्हायरल पोस्ट शेअर केली जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:आमदार रोहित पवार जामखेड मतदारसंघातून पराभूत झाले नाही; खोटा दावा व्हायरल
Written By: Sagar RawateResult: False
