
यंदाची विधानसभा निवडणूक महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात अटीतटीची ठरली. या पार्श्वभूमीवर “धुळे – ग्रामीण मतदारसंघात विधानसभा निवडणूकसाठी उभे राहिलेले महाविकास आघाडीचे उमेदवार कुणालबाबा रोहिदास पाटील यांना अवधान गावात शून्य मते मिळाली,” असा दावा केला जात आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल दावा भ्रामक असून कुणाल पाटील यांना एकूण 1057 मते मिळाली होती.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये जमाव गोधळ घालताना दिसतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “धुळे जिल्ह्यातील अवधान गाव.. कुणाल बाबा ला 0 मतदान दाखवत आहे.. जे गाव 70% त्यांच्या संस्थेत काम करते.. कट्टर कार्यकर्ते आहेत.. आंदोलन करत आहेत ते लोक.. नक्कीच घोटाळा.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्वप्रथम कीव्हर्ड सर्च करुन निवडणूक आयोगाची तपासल्यावर कळाले की, कुणालबाबा रोहिदास पाटील यांना एकूण 1,04,078 मते मिळाली.
मूळ पोस्ट – निवडणूक आयोग
तसेच निवडणूक आयोगाच्या निकालानुसार भाजप उमेदवार राघवेंद्र मनोहर पाटील यांनी एकूण 1,70,398 मते अर्थात 66,320 जास्त मते मिळवून कुणालबाबा पाटील यांचा पराभव केला.
मूळ पोस्ट – निवडणूक आयोग
अधिक सर्च केल्यावर कळाले की, धुळेच्या जिल्हा माहिती कार्यालयने व्हायरल व्हिडिओसोबत केलेल्या दाव्याचे ट्विट करत खंडण केले.
ट्विटमध्ये माहिती दिली आहे की, “धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीत अवधानमध्ये एकूण 4 मतदान केंद्र आहेत. सहायक निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या महितीनुसार त्याठिकाणी केंद्र क्रमांक 247, 248, 249 आणि 250 असून कुणालबाबा रोहिदास पाटील यांना अनुक्रमे 227, 234, 252 आणि 344 इतकी मते मिळाली आहेत.”
मूळ पोस्ट – ट्विटर
पुढे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले की, “धुळे ग्रामीण मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना अवधान मतदान केंद्रावर शून्य मते मिळाले अशी फेक न्यूज पसरवली जात आहे. आकडेवारीबाबत अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. तरी नागरिकांनी अशा फेक न्यूजला, आंदोलनाच्या फेक व्हिडिओला प्रतिसाद देऊ नये.”
मूळ पोस्ट – ट्विटर
तसेच धुळे ग्रामीण निवडणूक नोंदणी अधिकारीने आपल्या अधिकृत ट्विट कुणालबाबा रोहिदास पाटील यांना अवधान गावामधील बूथ क्रमांक 247, 248, 249 आणि 250 मध्ये पडलेल्या मतांची बेरीज 1057 मते असल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण आकडेवारी येथे व येथे उपलब्ध आहे.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ भ्रामक आहे. काँग्रेस आमदार कुणालबाबा रोहिदास पाटील यांना धुळे – ग्रामीण मतदारसंघातून शून्य नाहीतर एकूण 1057 मते मिळाली होती. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:महाविकास आघाडी उमेदवार कुणाल पाटीलांना खरंच धुळ्यामध्ये शुन्य मते मिळाली का ? वाचा सत्य
Written By: Sagar RawateResult: Misleading
