‘लोकमत’चा लोगो वापरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

Altered राजकीय | Political

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने ‘लोकमत’चे ग्राफिक कार्ड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लिहिले आहे की, भाजपाचे आमदार सुरेश धसांचे सतीश भोसले उर्फ खोक्या सोबत आर्थिक संबंध निष्पन्न झाले असून धसांचा राजीनामा घेऊन कारवाई केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हे ग्राफिक आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल होत असलेले ग्राफिक कार्ड बानावट आहे.

काय आहे दावा ?

देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि ‘लोकमत’चा लोगो असणाऱ्या व्हायरल ग्राफिकमध्ये लिहिलेले आहे की, “सुरेश धसांचे गुंड खोक्या उर्फ सतीश भोसले सोबत आर्थिक संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास, धसांचा राजीनामा घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.”

मूळ पोस्ट – ट्विटर | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे कोणते वक्तव्य केले असते तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, कोणत्याही अधिकृत माध्यमावर अशी बातमी आढळत नाही.

तसेच ‘लोकमत’च्या वेबसाईटवर आणि त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरदेखील हे ग्राफिक आढळले नाही.

याउलट ‘लोकमत’ने 12 मार्च रोजी फेसबुक पेजवर हे ग्राफिक बनावट असून त्यांच्याकडून जारी करण्यात आले नसल्याचे स्पष्ट केले.

पोस्टमध्ये व्हायरल ग्राफिक फेक सांगत लिहिले होते की, “सदर ग्राफिक कार्ड (क्रिएटिव्ह) ‘लोकमत’ने तयार केलेलं नाही. ‘लोकमत’चे नाव आणि लोगो वापरुन दिशाभूल करण्याचा हा प्रकार आहे. आम्ही सायबर क्राइमकडे तक्रार करत आहोत.”  

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल ग्राफिक बनावट असून ‘लोकमत’ने जारी केले नाही. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे कोणतेही वक्तव्य केले नाही. खोट्या दाव्यासह बनावट ग्राफिक व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:‘लोकमत’चा लोगो वापरुन देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने बनावट ग्राफिक व्हायरल

Written By: Sagar Rawate  

Result: Altered