
राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उबाठा गटाच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये त्या उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत भ्रष्ट असून शिवसेना ठाकरे गट मुंबई लुटत राहणार असे म्हणताना दिसतात.
दावा केला जात आहे की, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी आपल्या पक्षाला घरचा आहेर देत पक्ष, पक्ष प्रमुख आणि सदस्य नेत्यांना भ्रष्ट व मुंबईचे लुटारू म्हटले आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये किशोरी पेडणेकर म्हणतात की, “मुंबई आमची सोन्याची कोंबडी असून ती उद्धव साहेबांचा फॅमिली बिझनेस आहे. मुंबईत संजय राऊत यांनी केलेला पत्रा चाळ घोटाळा आणि आदित्य यांनी केलेला कोविड घोटाळा आहे. मुंबई आम्ही लुटणार.”
व्हिडिओच्या ग्राफिकमध्ये लिहिले होते की, “किशोरीताईने उबाठाचे पितळ उघडं पाडलं.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला आहे.
शॉर्ट न्यूज व्ह्यू नामक युट्यूब चॅनलने मूळ व्हिडिओ 17 डिसेंबर रोजी शेअर केला होता.
व्हिडिओच्या ग्राफिक आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मुंबई मराठी माणसांची, मुंबई बाळासाहेबांची – किशोरी पेडणेकर.”
या व्हिडिओमध्ये किशोरी पेडणेकर म्हणतात की, “मुंबई मराठी माणसांची, मुंबईकरांची, बाळासाहेबांची, उद्धवजींची आणि आदित्यच्या कामांची आहे.”
परंतु, या ठिकाठी कुठे ही त्या ठाकरे गट किंवा संबंधित सदस्यांविरोधात बोलताना आढळत नाही.

मूळ पोस्ट – युट्यूब | आर्काइव्ह
फेसबुक पोस्ट
ऊद्धव साहेब ठाकरे नामक फेसबुक फॅन पेजने शेअर केला हा व्हिडिओ किशोरी पेडणेकर यांनीदेखील आपल्या अधिकृत पेजवरुन 17 डिसेंबर रोजी रिशेअर केला.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ एडिट केलेला असून किशोरी पेडणेकर यांनी ठाकरे गटा विरुद्ध कोणतेही वक्तव्य केले नाही. खोट्या दाव्यासह व्हिडिओ पसरवला जात आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
Title:ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी ‘आम्ही मुंबई लुटणार’ असे म्हटले नाही; एडिटेड व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered


