
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची एक क्लिप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते म्हणतात की, “आपल्या देशातील गरीब आणि अशिक्षीत आहेत, जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.”
दावा केला जात आहे की, या व्हिडिओमध्ये नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपर समर्थन करत आहेत.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मुळात पंतप्रधान ईव्हीएमचा विरोध नाही, तर समर्थन करत होते.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की, “जगातील सर्व शिक्षीत देश आज पण बॅलेट पेपरवर नाव वाचून मतदान करतात.”
युजर्स हा व्हिडओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की,
“बॅलेट पेपर परत आणा, संविधान वाचवा. आपला देश गरीब आहे, पण मंत्री करोडपती आहेत.” (भाषांतर)
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाल की, ही व्हिडिओ क्लिप उत्तर प्रदेशच्या न्यू मुरादाबाद शहरात 3 डिसेंबर 2016 रोजी पारपडलेल्या परिवर्तन रॅली सभेची आहे.
या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतातील डिजिटालाइजेशनच्या फायद्याविषयी सांगत होते.
हा व्हिडिओ नरेंद्र मोदीच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर आपण संपूर्ण भाषण पाहू शकता.
वरील भाषण पाहिल्यावर कळते की, नरेंद्र मोदींनी व्हिडिओमध्ये कुठे ही बॅलेट पेपरचे समर्थन केले नाही.
या व्हिडओमध्ये 37:20 मिनिटावर आपण व्हायरल व्हिडिओ पाहू शकता.
नरेंद्र मोदी व्हायरल वक्तव्यनंतर सांगतात की, लोक म्हणतात की, आपला देश गरीब व नागरिक अशिक्षित आहे, त्यांना काही समजत नाही. परंतु, या जगात शिक्षित देश पण निवडणुकीच्या वेळी बॅलेट पेपरवर लिहिले नाव वाचतो आणि त्यावर शिंका लावतो, अमेरिकादेखील असच करतो. परंतु भारत देश ज्यांना गरीब आणि अशिक्षित समजल जात, तो देश बटन दाबून आपले मतदान करतो.”
पुढे ते म्हणतात की, “भारताचे नागरिक नविन गोष्ट आत्मसात करण्यासाठी वेळ लावत नाही. जर सरळ मार्गाने नागरिकांना समजावले तर त्यांच्या लक्षात येईल. आजच नव्हे जर भविष्यादेखील काला पैसा थांबवायचा असेल तर डिजिटल व्यवहार करणे आवश्यक आहे.”
हे वक्तव्य आपण येथे पाहू शकतात.
खालील तुलनात्मक व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येईल की, मूळ व्हिडिओला एडिट करून अर्धवट वाक्य पसरविले जात आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ अर्धवट आहे. मूळ व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमचे समर्थन करत होते. चुकीच्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
 
					  Title:पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमच्या जागी बॅलेट पेपरचे समर्थन केले होते का? वाचा सत्य
Fact Check By: SAGAR RAWATEResult: Altered



 
	 
						 
						