लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय दलात ‘भगवेकरण’ होत असल्याचे सांगितले का ? वाचा सत्य

Altered Social

लेफ्टनंट जनरल राजीव घई यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते कथितपणे म्हटले होते की, “भारतीय सशस्त्र दलांचे राजकारणीकरण किंवा भगवेकरण भारतीय सेनेच्या मूलभूत मूल्यांना खिळखिळे करत आहे.”

दावा केला जात आहे की, “ या ठिकाणी लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय सैन्यदलात राजकारणीकरण किंवा भगवेकरण होत असल्याचा आरोप केला आहे.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणतात की, “या गणवेशाच्या सेवेत आपण अनेक दशके अर्पण केलेली असून एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नात्याने मी अत्यंत चिंतेने हे सांगतो इच्छितो की, भगव्या राजकारणाचा वाढता प्रभाव भारतीय सेनेच्या मूलभूत मूल्यांना खिळखिळे करत आहे. आपली ताकद नेहमीच शिस्त, एकता आणि घटनात्मक कर्तव्य या तत्त्वांवर आधारित राहिली आहे, धार्मिक ध्रुवीकरणावर नाही. जेव्हा विचारसरणी निष्ठा ठरवू लागते, तेव्हा ती मनोबलात फूट पाडते, अंतर्गत अविश्वास वाढवते आणि लढाऊ क्षमतेला दुर्बल करते. जर हा प्रवाह असाच सुरू राहिला, तर आपला पराभव बाह्य शत्रूने नव्हे, तर आपल्यामध्ये पसरत असलेल्या राजकीय विषामुळे होईल.”

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “लेफ्टनंट जनरल राजीव घई, भारतीय सैन्य. सेवा करणाऱ्या जनरल यांचे कडक शब्द.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स अमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनावट आहे.

रिपब्लिक वर्ल्ड न्यूज चॅनलने 18 ऑक्टोबर रोजी एका मोठ्या आवृत्तीचा व्हिडिओ युट्यूबवर शेअर केल्याचे आढळले.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पाकिस्तानच्या चुकीबद्दल टीका केली आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती उघड केली.”

सदरील संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते की, हा व्हिडिओ व्हायरल क्लिपशी मिळतेजुळते पण त्यातील ऑडिओ वेगळा आहे. 

मुळात या व्हिडिओमध्ये लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल भाष्य केले. या ठिकाणी कुठेही त्यांनी असे म्हटले नाही की, भारतीय सशस्त्र दलांचे राजकारणीकरण किंवा भगवेकरण भारतीय सेनेच्या मूलभूत मूल्यांना खिळखिळे करत आहे.

तसेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिले होते की, “लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी ‘फोर्सेस फर्स्ट कॉन्क्लेव्ह’मध्ये दिलेल्या भाषणात पाकिस्तानच्या दीर्घकाळ चालत आलेल्या फसवणुकीचे पर्दाफाश केले आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ संबंधी महत्त्वाच्या तपशीलांची माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, भारताच्या सशस्त्र दलांनी सीमापार धोके ओळखण्यासाठी प्रतिबंधक क्षमता, गुप्तचर यंत्रणा आणि अचूक प्रतिसाद देण्याची ताकद कशी वाढवली. तसेच त्यांनी आधुनिक युद्धतंत्र, तंत्रज्ञान आणि निर्णायक नेतृत्व हे भारताच्या सक्रिय संरक्षण धोरणाचे प्रमुख घटक असल्याचे सांगितले.”  

मूळ पोस्ट – युट्यूब

खंडण

पीआयबीने ट्विट करत स्पष्ट केले की, व्हायरल व्हिडिओ बनावट असून लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी असे कोणतेही विधान केलेले नाही.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल बनावट आहे. लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय सशस्त्र दलांचे राजकारणीकरण किंवा भगवेकरण होत असल्याचे विधान केले नाही. मूळ व्हिडिओमध्ये ते ‘ऑपरेशन सिंदूरबद्दल’ सांगतात. खोट्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भारतीय दलात ‘भगवेकरण’ होत असल्याचे सांगितले का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate  

Result: Altered