लॉस एंजेलिस शहरातील आगीसंदर्भात AI व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

False Social

अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या भयंकर आगीने हाहाकार माजवलेला आहे. गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू असेलली ही आग विझवण्यासाठी तेथील अग्निशामक दल आणि इतर यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. सोशल मीडियावर या आगीत बेचिराख झालेली घरे आणि बचावकार्याचे अनेक व्हिडिओ शेअर होत आहेत. 

अशाच एका व्हायरल व्हिडिओमध्ये अग्निशामक दलातील सदस्य प्राण्यांना वाचवताना दिसतात. दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ सद्यपरिस्थितीत लॉस एंजेलिस शहरातील बचावकार्याचा आहे. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ खरा नसून, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच AI तंत्राद्वारे तयार केलेला आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये अग्निशामक दलाचे कर्मचारी आग लागलेल्या जंगलातून प्राण्यांना वाचवताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “लॉस एंजेलिस च्या जंगलाला दि ९ जानेवारी रोजी लागलेल्या आगीत घरे जाळली त्याचबरोबर झाडांनाही पेट घेतला. या आगीत वित्तहानी झाली असून या आगीत अनेक प्राणी देखील जखमी झाले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक धावून आले आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओ AI तंत्रज्ञानाद्वारे तयार केला असल्याचे कळाले.

@futureriderus नामक यूजरने हाच व्हिडिओ 11 जानेवारी रोजी  इंस्टाग्रामवर शेअर केला होता.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम

तसेच हा व्हिडिओ AI इन्फो’ सह टॅग केले होता.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम

@futureriderus या इंस्टग्राम अकाउंटची प्रोफाइल तपासल्यावर व्हायरल व्हिडिओप्रमाणे लॉस एंजेलिस शहरात लागलेल्या आग संबंधित अनेक AI द्वारे तयार केलेले व्हिडिओ शेअर केल्याचे आढळले.

मूळ पोस्ट – इंस्टग्राम

युजरने अशाच एका व्हिडिओवर कमेंट पिन करुन लिहिले की, “होय, 

AI चा वापर करुन हे व्हिडिओ तयार करण्यात आले आहे. परंतु, तेथील (लॉस एंजेलिस) दर्शविलेल्या समस्या “अत्यंत वास्तविक” आहेत.”

पुढे युजर अग्निशामकांबद्दल लिहितो की, “या समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हे व्हिडिओ तयार करण्यासाठी पुढाकार घेतला. ज्यामुळे लोकांना या शोकांतिका पाहण्यात आणि त्याबद्दल खरोखर विचार करता येईल.”

मूळ पोस्ट – इंस्टाग्राम

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ लॉस एंजेलिस शहरातील अग्निशामक दलाचा नाही. लोकांना तेथील मूळ परिस्थितीची जाणीव करुन देण्यासाठी हा व्हिडिओ AI द्वारे तयार करण्यात आला आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:लॉस एंजेलिस शहरातील आगीसंदर्भात AI व्हिडिओ व्हायरल; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate  

Result: False