
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक विमान कोसळताना दिसते.
दावा केला जात आहे की, हा व्हिडिओ बारामतीमधील विमान अपघात होत असताना प्रत्यक्ष चित्रित केलेला आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआयद्वारे तयार केला आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक विमान जमिनीवर कोसाळून त्याचा स्फोट होतो आणि लोक गोंधळून पळायला लागतात. तसेच त्या ठिकाणी अग्निशामक दल आग विझवण्याचा प्रयत्न करते. एक व्यक्ती सांगते की, हे विमान बारामतीमध्ये कोसळले असून हे लाइव्ह द्दष्य आहेत.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजित पवार आणि विमान अपघात हॅशटॅग अशा शब्दांचा उल्लेश करण्यात आला आहे.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “बारामतीमध्ये खाजगी जेट अपघात लाइव्ह.” (भाषांतर)
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एआय द्वारे तयार केलेला आहे.
टाईम ट्रॅव्हलर नामक इंस्टाग्राम अकाउंटने हा व्हिडिओ 29 जानेवारी रोजी शेअर केला होता.
मूळ पोस्ट – इंस्टग्राम | आर्काइव्ह
टाईम ट्रॅव्हलर हे आकाउंट साहिल कुमार नामक युजरचे आहे. प्रोफाईलच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे सर्व रील्स केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने तयार केलेले आहेत.”

या इंस्टग्राम अकाउंटने बारामती विमान अपघाताचे अनेक एआय व्हिडिओ शेअर केलेले आहेत.

पोस्ट – आर्काइव्ह
सध्या इराणमध्ये सुरु असलेल्या तनावाच्या पार्श्वभूमीवर या इंस्टग्राम अकाउंटवर जाळपोळचे एआय व्हिडिओ शेअर केले आहेत.

खरे सीसीटीव्ही फुटेज
अजित पवार यांच्या बारामतीमधील विमान अपघाताचे सध्या दोन अधिकृत व्हिडिओ माध्यमांवर उपलब्ध आहे.
पहिली सीसीटीव्ही फुटेज 28 जानेवारी माध्यमांवर आली. ज्यामध्ये सकाळी नेमके 8 वाजून 46 मिनिटे 02 सेकंदांनी विमानतळापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या महामार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अचानक आगाचा गोळा आणि धुराचे प्रचंड लोट दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणखी चार जणांना घेऊन जाणारे विमान त्याच क्षणी कोसळल्याची घटना घडली.
तर दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अजित पवार यांना घेऊन जाणारे लियरजेट 45 विमान बारामती विमानतळाजवळ कोसळण्यापूर्वी डाव्या बाजूला झुकताना दिसते.
अधिक माहिती येथे व येथे वाचू शकतात.
निष्कर्ष
यावरुन सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या बारामतीमधील विमान अपघाताचे लाइव्ह फुटेज दर्शवत नाही. मुळात हा व्हिडिओ एआयद्वारे तयार केलेला असून खोट्या दाव्यासह व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामव ट्विटरयेथे फॉलो करा.)
Title:अजित पवार यांच्या विमान अपघाताचे लाइव्ह फुटेज म्हणून एआय व्हिडिओ व्हायरल
Fact Check By: Sagar RawateResult: False


