वेगवेगळ्या मित्राच्या नावे पैसे पाठविल्याचा मैसेजचा सुळसुळाट...

परिचय

मोबाईल ही खरेतर काळाची गरज झाली आहे. अगदी लहान मुलांनाही मोबईल बद्दलचे जे आकर्षण आहे ते सर्वश्रूत आहे. सोशल मिडियाने तर जगच चक्क हाताच्या बोटांवर आणले आहे. त्यामुळे आपण कुठेही, कधीही, केव्हाही जगाशी कनेक्ट होवू शकतो. सोशल मिडिया हे आता जवळपास प्रत्येकाच्या ओळखीचा झाला आहे. फेसबुक, whats up , ट्विटर किंव्हा इंस्त्राग्राम यांच्याशी अनेकजण जोडलेले असतात. त्यामुळे एखादा मैसेज किंव्हा एखादी पोस्ट ही बऱ्याचवेळा एकाच वेळी अनेकांपर्यंत पोहोचते. मग जेव्हा केव्हा त्यानंतर त्यावर चर्चा सुरु होते. त्यानंतर तो विषय संशोधनाचा विषय होतो.

एखाद्या मैसेज आल्यानंतर जेव्हा वैयक्तिक पातळीवर एखाद्याचे आर्थिक नुकसान होते, आणि त्यानंतर ते वैयक्तिक पातळीवर न राहता सार्वजनीक पातळीवर अनेकांचे आर्थिक नुकसान होत आहे, अशा चर्चांना जेव्हा उधान येते, तेव्हा मात्र संशोधनाची गरज आवश्यक होते.

कथन

सध्या whats up वर एक मैसेज अनेकांपर्यंत पोहोचला आहे. या मैसेजमध्ये प्रत्येकवेळा एक नवीन मित्र किंव्हा मैत्रीणीच्या नावाचा उल्लेख आढळतो. तसेच त्यामध्ये त्या प्रत्येक वेळा तुमच्या बँक अकाऊंटमध्ये एक हजार रुपये टाकले आहेत असा मैसेज येत आहे. त्यामुळेच fact crescendo टीमने या विषयातील खरेपणा शोधण्याचा प्रयत्न केला.

अशा प्रकारचा मैसेज आत्तापर्यंत अनेकांपर्यंत पोहोचला आहे. काही लोकांच्या मते या मैसेजमुळे उगाच आर्थिक भूर्दंड पडला अशा प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.

तथ्य पडताळणी

अशा प्रकारचे आर्थिक गोष्टीशी सबंध असणारे मैसेज अनेकांना आलेले आहेत असे दिसून आलेले आहेत. या मैसेजमध्ये विविध मित्र किंव्हा मैत्रीण यांच्या नावाचा उल्लेख केलेला आढळतो. या मैसेजमध्ये फक्त मित्र किंव्हा मैत्रीण यांचे नावे बदलतात. पण पैशांचा उल्ल्केख आणि बाकी मैसेज सेमच आहे. त्या मैसेजमध्ये दिली जाणारी link देखील सारखीच आहे. त्यामध्ये कोणताच बदल नाहीये. तसेच अशा प्रकारचा मैसेज फक्त एकदाच येवून थांबत नाही तर, वारंवार असा मैसेज दररोज केवळ मित्र किंव्हा मैत्रीण यांचे नाव बदलून येत असतो. अशा मैसेजच्या संख्या ही मोबाईलमध्ये दररोज वाढतच जाते.

[embed]https://www.youtube.com/watch?v=7-3gN8hrWZ0&feature=youtu.be[/embed]

या संदर्भात विविध वृत्तपत्रांमध्ये बातमी आली आहे. एका वृत्तपत्रात तर पोलिसांची मदत घेत, नागरिकांनी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Mirror l Telangana Today

याशिवाय विविध सोशल मिडीयावर या संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. या प्रतिक्रीयामध्ये लोकांनी अशा प्रलोभन देणाऱ्या लिंक पासून सावध राहावे अशा सूचना देखील दिल्या आहेत.

परंतु पुणे सायबर पोलिसांच्या एका पथकाने Fynd साईट हि ऑनलाईन शॉपिंग साईट असून, ही साईट वापरण्यासाठी सुरक्षित आहे, अशी माहिती देत या साईटला क्लिन चीट दिले आहे. त्याच प्रमाणे Fynd या साईट कडूनही आमची साईट हि संपूर्णपणे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे असे पोस्ट करण्यात आले आहे.

याशिवाय आमच्या Fact Crescendo टीम कडून देखील मोबाईल वरून त्या मैसेजच्या आधारे तथ्य शोधले असता एका विशिष्ट बिंदू किंव्हा क्रिया नंतर पुढची सर्व प्रक्रिया बंद पडते. त्यामुळे त्यानंतर अशा मैसेजचा शोध तिथेच संपतो.

https://www.youtube.com/watch?v=wRGk5C9MU5I&feature=youtu.be

निष्कर्ष :
संपूर्ण अभ्यासानंतर आर्थिक गोष्टीशी संबंधित येणाऱ्या एखाद्या मित्र किंव्हा मैत्रीणीच्या नावाने येणारा मैसेज हा पूर्णपणे खोटा असून, अशा प्रकारच्या मैसेजच्या द्वारे मोबाईल धारकाच्या बँक अकाऊंट मध्ये कोणताही आर्थिक लाभ होत नाही. त्यामुळे अशा मैसेज पासून नागरिकांनी सावध राहून, अशा लिंक फॉलो करू नयेत. तसेच जर एखाद्या व्यक्तीने जर अशी लिंक फॉलो केली तरी एका विशिष्ट प्रक्रियेनंतर हि लिंक बंद पडते, असे ०७ फेब्रुवारी २०१९ या दिवशी आढळून आले. त्यामुळे त्यातून कोणतेही आर्थिक नुकसान होत नाही.

MisleadingTitle: मित्राने तुम्हाला एक हजार रुपये पाठविल्याचा मैसेज खरा आहे का?"
Fact Check By: Amruta Kale
Result: Fake