मालेगावमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करण्यात आल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Coronavirus False

कोरोना विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याने महाराष्ट्रातील मालेगाव हे शहर डार्क रेड झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मालेगावमध्ये आतापर्यंत 15  कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला असून 47 संशयितांचा मृत्यू झाला आहे.

या पार्श्वभूमीवर ‘मालेगावमधील आजची सत्य परिस्थिती’ म्हणून सध्या समाजमाध्यमात एक व्हिडियो व्हायरल होत आहे. या व्हिडियोत एका मशिदीतून नागरिक बाहेर पडत असताना दिसत आहेत. हा व्हिडियो मालेगावातीलच आहे का? याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

फेसबुकअर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हिडियोमध्ये एक पोलीस अधिकारी मशिदीतून बाहेर येणाऱ्या एका व्यक्तीला ही मशीद कोणती आहे? अशी विचारणा करतो. त्यावेळी ती व्यक्ती “टेमकर मोहल्ला” असे सांगते. हे ठिकाण नेमके कोठे आहे याचा शोध घेतला असता हा भाग मुंबईत असल्याचे आढळले. 

संचारबंदी आणि कलम 144 चे उल्लंघन केल्याने टेमकर मशिदीवर कारवाई झाली का? याचा शोघ घेतला. त्यावेळी मुंबई मिरर या वृत्तपत्राच्या ट्विटर खात्यावरून 23 मार्च 2020 रोजी करण्यात आलेले एक ट्विट आढळले. यात याच व्हिडियोसह याप्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई केल्याचे म्हटले आहे. 

Archive

न्यूज 24 इंडिया या हिंदी वृत्तवाहिनीनेसुद्धा या कारवाईबाबतचे ट्विट केले होते. तेही आपण खाली पाहू शकता.

Archive

पीटीआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने मुंबई मिरर आणि डेक्कन हेराल्ड या वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांनीही या कारवाईबाबतचे दिलेले वृत्त दिसून आले. यातून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडियो जुना म्हणजेच मार्च 2020 मधील असून मे 2020 मधील मालेगावमधील नाही.

निष्कर्ष

मालेगावमधील मशिदीचा हा व्हिडियो असल्याचा दावा असत्य आहे. हा व्हिडियो मुंबईतील डोंगरी भागातील टेमकर मशिदीचा जुना म्हणजेच 23 मार्च 2020 रोजीचा आहे.

(फॅक्ट क्रेसेंडो मराठी आता टेलीग्रामवरसुद्धा ! आमच्या चॅनेलला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Avatar

Title:मालेगावमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन करण्यात आल्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False