काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्या वावरत असून नागरिकांमध्ये भिती निर्माण झाली आहे. तसेच वन विभाग बिबट्याचा शोध घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वन अधिकारी एका बिबट्याला एका घरातून पकडतात. दावा केला जाता आहे की, वन विभागाद्वारे बिबट्याला एन – 1 सिडको भागातील एका घरातून पकडल्याचा हा व्हिडिओ आहे.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ गेल्यावर्षीचा असून हा बिबट्या नाशिकमध्ये पकडण्यात आला होता.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये एक घरातून वन अधिकारी बिबट्याला पायऱ्यांवरून खाली घेऊन जाताना दिसतात.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “अखेर बिबट्या पकडला! सिडको N-1 मध्ये सापडला तेही अलिशान एरीयात आणि अलिशान घरात.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे.

इंडिया टुडेने 19 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीनुसार हा व्हिडिओ नाशिकचा आहे.

हा धागा पकडून अधिक सर्च केल्यावर कळाले की, नोव्हेंबर 2023 मध्ये नाशिकमधील गोविंदनगरमधून दोन बिबटे पकडण्यात आले होते. पहाटे 7:30 सुमारास सावतानगर परिसरात पहिला बिबट्या नर असल्याचे आढळून आले, तर गोविंदनगर येथे पहाटे 5:30 सुमारास मादी असल्याचे आढळले. अधिक माहिती येथे वाचू शकता.

खालील व्हिडिओमध्ये आपण व्हायरल व्हिडिओचा संपूर्ण भाग पाहू शकता. या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये दिली आहे की, “नाशिकमध्ये एका घरात बिबट्या घुसला आणि बेडरूममध्ये लपला होता. या व्हिडिओमध्ये वन अधिकारी बेशुद्ध बिबट्याला सुरक्षितपणे वाचवताना दिसत आहेत.”

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, वन विभागाद्वारे बिबट्याला पकडतानाचा हा व्हायरल व्हिजिओ छत्रपती संभाजीनगरचा नाही. नाशिकमध्ये 2023 मध्ये या बिबट्याला वन विभागाने पकडले होते. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल हात आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:छत्रपती संभाजीनगरमधील बिबट्या पकडल्याची अफवा व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading