पाईपमधून वाट काढणाऱ्या दुचाकीस्वारांचा व्हिडिओ पुण्याचा नसून मुंबईचा आहे; वाचा सत्य

Missing Context Social

खराब रस्ता आणि वाहतुकीला अडथळा झाल्याने लोकांनी अजब शक्कल लढविल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये काही लोक रस्त्यावर ठेवलेल्या पाईपमधून दुचाकी चालवत असल्याचे दिसते. 

अनेक युजर हा व्हिडिओ पुण्यातील वाहतुकीची दुर्दशा म्हणून शेअर करीत आहेत. 

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ पुण्याचा नसून मुंबईचा आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.

काय आहे दावा ?

रस्त्यावरील ट्राफिकमुळे रसत्याच्या कडेला असलेल्या मोठ्या रिकाम्या पाईपलाईनमधून दुचाकीस्वार जात असल्याचे व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते.

हा व्हिडिओ शेअर करताना युजर्स लिहितात की, “हिंजवडी आणि चांदनी चौक येथे भारतातील पहिली हायपर लूप सेवा सुरू प्रवाशांचा वेळ वाचला.प्रत्यक्ष तंत्रज्ञान बघण्या साठी जर्मन आणि रशियाचे शिष्ट मंडळ भेट देणार.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

व्हायरल व्हिडिओमध्ये ‘@vishu_bhoir111’ असा वॉटरमार्क दिसतो. 

त्याविषयी सर्च केल्यावर कळाले की, विश्वजीत भोईर नामक व्यक्तीने आपल्या भिवंडीसिटी या ईस्टाग्राम अकांउटवर 30 एप्रिल 2023 रोजी हा व्हिजिओ शेअर केला होता.

कॅप्शनमध्ये हा व्हिडिओ भिवंडी – कल्याण भागातील असल्याचे म्हटले आहे.

‘लोकमत’ने या व्हिडिओची दखल घेत तो कल्याण – शिळ रोडवरील सांगितले आहे.

https://www.facebook.com/LokmatKalyanDombivli/videos/544114997890682/?__tn__=%2CO-R

हाच व्हिडिओ विश्वजीत भोईर यांनी आपल्या फेसबुक अकांउटवर शेअर करून कल्याणमधील पायाभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका, स्थानिक खासदार व इतर राजकीय नेत्यांना टॅग करीत म्हटले की, “देसाईगाव, कल्याण – शिळ रोड, नवीन लोढा वसाहतीमुळे रोजच स्थानिक लोकांना या अशा ट्रॅफिक चा सामना करावा लागतो. किती दिवस आम्ही सामान्य जनतेने त्रास सहन करायचा?”

https://www.facebook.com/vishvajeet.bhoir/posts/pfbid0U7sxxPNqbTe6Ww3r5EcPp6zv6zVvUoMCWGGMvfLNeyHSWqkcmB7MV1Xbz3visLL2l?__cft__[0]=AZWCsIjI5Kbqzl2CsPg81lPaWGmlNKdoTD7oaT-l9bYRTPb8ibv2Kuenkx1qRhRd3Oz4wqnMFL9EwMwtTRGCAqX7MUGuNvh3gH6XOzSUT5ANR25Me1ZfBiC9jz_YozKc6W31Ye02AsTvFz1q6GyHhZrV&__tn__=%2CO%2CP-R

या पोस्टसोबत विश्वजीत भोईर यांनी या ठिकाणाचे मॅपवरील लोकेशेनदेखील शेअर केलेले आहे.

सदरील माहितीच्या आधारे गुगल मॅपवर त्या ठिकाणाला सर्च केल्यावर कल्याण – शिळ रोडवर व्हिडिओप्रमाणेच मोठे पाईप आढळले.

पुण्यातील ट्राफिक समस्या

एका खाजगी अहवलानुसार वाहतूक कोडींच्या बाबतील पुणे सहाव्या क्रमांकावर आहे. चांदणी चौक आणि हिंजवडी सोबत पुण्यातील इतर ठिकाणीदेखील वाहतुक कोडींची समस्या वाढत आहे. संपूर्ण बातमी येथे वाचा.

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ पुण्याचा नसून मुंबईच्या कल्याण-शीळ रोडवरील आहे. चुकीच्या दाव्यासह क्लिप व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट-चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाईपमधून वाट काढणाऱ्या दुचाकीस्वारांचा व्हिडिओ पुण्याचा नसून मुंबईचा आहे; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate 

Result: Missing Context