मराठा समाजाने असंवैधानिकरित्या ओबीसीचे आरक्षण लुटले; असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले का? वाचा सत्य

एका क्लिपद्वारे दावा केला जात आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठा समाजाने असंवैधानिक पद्धतीने आरक्षण मिळवले असे म्हटले. “मागच्या दाराने ओबीसीचे आरक्षण लुटणे हे आपल्याला माण्य आहे का ? आता हेच काम देशातील प्रत्येक राज्यात होईल,” असे ते क्लिपमध्ये बोलतात. दावा केला जात आहे की, या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षण विरोधात बोलत […]

Continue Reading

फोटोमध्ये दारू पिणारी व्यक्ती मनोज जरांगे पाटील नाहीत; बनावट फोटो व्हायरल

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे दारू पीत असल्याचा एक कथित फोटो व्हायरल होत आहे.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली. पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो बनावट आहे. दुसऱ्याच व्यक्तीच्या फोटोला एडिट करून मनोज जरांगे पाटील यांचा चेहरा लावण्यात आला आहे.  काय आहे दावा ? व्हायरल […]

Continue Reading

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे समर्थकांनी अग्निशामक दलाची गाडी फोडली का?

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र 10 टक्के आरक्षण देण्याचे निर्णय घेतला असून परंतु, ते आरक्षण ओबीसीतून द्यावे अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी केली आहे.  सध्या मराठा आरक्षणाच्या पर्श्वभूमीवर जन आक्रोशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ काही लोक चार वाहनांची वाहणाची तोडफोड करताना दिसतात.  फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर […]

Continue Reading

मराठा आंदोलनात बॉम्बस्फोटच्या कटाची जुनी बातमी पुन्हा व्हायरल; वाचा सत्य

जालनातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी जाळपोळ आणि पोलिस आणि आंदोलकांमध्ये तणावदेखील उद्भवला.  या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राच्या एका बातमीचे कात्रण सोशल मीडियावर शेअर केले जात आहे. या बातमीत म्हटले आहे की, शिवप्रतिष्ठान संस्थेने मराठा आंदोलनात गावठी बॉम्ब स्फोट घडविण्याचा कट रचला होता. […]

Continue Reading

विवेक रहाडेच्या नावाने व्हायरल होत असलेली आत्महत्येची चिठ्ठी बनावट; वाचा सत्य

बीड तालुक्यात केतुरा येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. सोशल मीडियावर विवेकने आत्महत्येपूर्वी लिहिलेली म्हणून एका चिठ्ठीचा फोटो वायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत बनावट चिठ्ठी असल्याचे समोर आले.  काय आहे दावा? सोशल मीडियावरील विवेकच्या नावाने व्हायरल होत असलेल्या चिट्ठीमध्ये लिहिले आहे की, “मी विवेक कल्याण रहाडे […]

Continue Reading

मराठा आरक्षण रद्द झालेले नाही. ती केवळ अफवा आहे. वाचा सत्य

मराठा आरक्षण रद्द झाल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या व शिक्षणामध्ये आरक्षण देणारा निर्णय रद्द करण्याचा हायकोर्टाने निर्णय घेतल्याचे या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्याला पुरावा म्हणून नागपूरच्या भूमि अभिलेख कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या आदेशाची प्रत शेयर केली जात आहे. त्यामुळे ज्यांना आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरी मिळाली त्यांनाही फटका […]

Continue Reading