व्हायरल फोटो खरंच शाहजहानची राणी मुमताज महलचा आहे का ? वाचा सत्य

Social दिशाभूल करणाऱ्या I Misleading

राजेशाही वेशभूषेतील एका महिलेचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

दावा केला जात आहे की, ही महिला मुघल सम्राट शाहजहानची पत्नी मुमताज महल आहे, जिच्यासाठी ताजमहाल बांधण्यात आला होता.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा फोटो आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल फोटो मुमताज महल यांचा नसून त्या भोपाळच्या बेगम, शहाजहान यांचा आहेत.

काय आहे दावा ?

फोटोमध्ये लिहिले आहे की, “शाहजान ने हिच्यासाठी ताजमहाल बांधला होता.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल फोटो मुमताज महलचा नाही.

रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या वेबसाईटवर मोठ्या स्वरूपातला मूळ फोटो आढळला. फोटोसोबत दिलेल्या माहितीनुसार ही महिला भोपाळच्या बेगम सुलतान, शाहजहान बेगम आहेत.

शाहजहान बेगम

शाहजहान बेगम यांचा जन्म 29 जुलै 1838 रोजी भोपाळजवळील इस्लामनगरमध्ये झाला. वयाच्या 6 व्या वर्षी त्यांना भोपाळच्या राज्यकर्त्याचा दर्जा देण्यात आला होता. त्यांचे लग्न 1855 मध्ये वाकी मुहम्मद खान यांच्याशी करण्यात आले. शाहजहान बेगम दोन टर्म शासक होत्या. पहिल्यांदा 11 एप्रिल 1845 रोजी ब्रिटिश सरकारने अधिकृतपणे त्यांना राज्याच्या नेत्या म्हणून घोषित करून उत्तराधिकारी म्हणून मान्यता दिली. दुसऱ्यांदा 1868 मध्ये तिच्या आईच्या मृत्यूनंतर त्या शासक बनल्या आणि 1901 पर्यंत त्यांनी राज्या कारभार संभाळला. अधिक माहिती आपण येथेयेथे वाचू शकता.

मुमताज महल

मुमताज यांचे खरे नाव अर्जुमंद बानो बेगम असून त्यांचा जन्म एप्रिल 1593 रोजी आग्रामध्ये झाला होता. 10 मे 1612 रोजी राजकुमार खुर्रम (शहाजहान पहिला) यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. मुमताजने आग्रा येथील नदीकाठच्या बागेसाठी काही काळ दिला आणि या बागेबद्दलची त्यांची ओढ कदाचित त्यांच्या स्मारकाच्या अंतिम स्वरूपाला कारणीभूत ठरली असावी.

खालील आपण ताजमहालच्या सरकारी वेबसाईवरील अर्जुमंद बानो बेगम उर्फ मुमताज यांचे चित्र पाहू शकतो.

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल फोटो मुमताज महल यांचा नाही. या भोपाळच्या बेगम, शाहजहान बेगम आहेत. भ्रामक दाव्यासह फोटो व्हायरल होत आहे. 

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770)  पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुकइन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:व्हायरल फोटो खरंच शाहजहानची राणी मुमताज महलचा आहे का ? वाचा सत्य

Written By: Sagar Rawate 

Result: Misleading


Leave a Reply