
आयोध्येमध्ये 5 ऑगस्ट रोजी राम मंदिर भूमिपूजन होत आहे. या पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामायणावर आधारित पोस्टाची नवीन तिकिटे प्रसिद्ध केली असा दावा केला जात आहे. रामायणातील विविध प्रसंग दर्शवणाऱ्या या टपाल स्टॅम्पचे फोटो मोठ्या प्रमाणात शेयर करण्यात येत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली असता कळाले की, रामायणाचे ही तिकिटे 2017 सालीच प्रसिद्ध करण्यात आली होती.
काय आहे पोस्टमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । अर्काइव्ह
तथ्य पडताळणी
व्हायरल फोटोला रिव्हर्स इमेज सर्च केले असता 24 सप्टेंबर 2017 रोजीची एनडीटीव्हीची बातमी आढळली. यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसी येथील तुलसी मानस मंदिर येथे रामायणावर आधारित पोस्टाच्या स्टॅम्पचे प्रकाशन करण्यात आले होते.
यानुसार शोध घेतला असता एबीपी न्यूज चॅनेलवर 22 सप्टेंबर 2017 रोजी झालेल्या या प्रकाशन सोहळ्याचा व्हिडियो सापडला. यामध्ये स्पष्ट दिसते की, नरेंद्र मोदी रामायणावरील स्टॅम्पचे प्रकाशन केले.
मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुक
भारतीय टपाल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार, 22 सप्टेंबर 2017 रोजी रामायणावर आधारित एकुण 11 डाक तिकिटे प्रकाशित करण्यात आली होती. यापैकी 10 स्टॅम्प पाच रुपये तर एक स्टॅम्प 15 रुपये किमतीचा होता.

मूळ वेबसाईट येथे पाहा – भारतीय टपाल खाते
निष्कर्ष
यावरून स्पष्ट होते की, रामायणावर आधारित ही डाक तिकिटे तीन वर्षे जुनी आहेत. ती नुकतीच प्रकाशित करण्यात आलेली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी नुकतेच रामायणावर आधारित पोस्टाचे स्टॅम्प जारी केले, हा दावा असत्य आहे.

Title:नरेंद्र मोदी यांनी नुकतेच रामायणावर आधारित पोस्टाचे नवे स्टॅम्प जारी केले का? वाचा सत्य
Fact Check By: Agastya DeokarResult: False
