TRUE PICTURE: पोर्तुगालमधील महामार्गाचा फोटो भारतातील महामार्ग म्हणून व्हायरल

False सामाजिक

इतर देशांमधील फोटो भारतातील असल्याचे सांगून पोस्ट फिरवण्याचे प्रकार सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात केले जातात. भारतात नसलेले महामार्ग, पूल, इमारतींचे फोटो फेसबुकवर शेयर करून लाईक करण्याचे आवाहन केले जाते. अशाच एका महामार्गाचा फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतो. तो महामार्ग जम्मू-उधमपूर असल्याचे म्हटले जातेय. फॅक्ट क्रेसेंडोने याची पडताळणी केली.

फेसबुकअर्काइव्ह

फेसबुक पोस्टमधील फोटोमध्ये एक विशाल द्रुतगती महामार्ग दिसतो. भुयारातून जाणारा हा मार्ग उंच खांबावर बांधलेला आहे. त्याखालून आणखी एक महामार्ग गेलेला आहे. पोस्टमध्ये लिहिले की, हा महामार्ग विदेशातील नाही तर आपल्या भारतातील जम्मू-उधमपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक (NH-1) आहे.

तथ्य पडताळणी

फेसबुक पोस्टमधील फोटोचे निरीक्षण केल्यावर दिसून येते की, वाहने उजव्या बाजूने चालताना दिसतात. भारतात वाहने डाव्या बाजूने चालतात. त्यामुळे या फोटोच्या सतत्येबद्दल शंका उपस्थित होते.

फोटोला यांडेक्स रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला मून शॉट सेंट्रल नावाच्या एका वेबसाईटवर Stunning And Unbelievable Bridges Around The World नावाचा लेख आढळला. यामध्ये फेसबुक पोस्टमध्ये दिलेला फोटो दिलेला आहे. तो तुम्ही खाली पाहू शकता.

मूळ लेख येथे वाचा – मून शॉट सेंट्रलअर्काइव्ह

लेखानुसार हा फोटो पोर्तुगालच्या फुंचाल शहतील याओ गोम्स पूल (João Gomes Bridge) आहे. फुंचाल ही मडेएरा या पोर्तुगीज बेटाची राजधानी आहे. पूल 1994 साली बांधण्यात आला होता. विकिपीडियावरील माहितीनुसार मडेएरा बेटावरील पहिला द्रुतगती महामार्ग प्रकल्प  VR-1 अंतर्गत हा पूल बांधण्यात आला होता.

येथूनच आम्हाला या पूलाचा पत्ता मिळाला. त्यानुसार आम्ही गुगल मॅप्सवर हा पूल शोधला. स्ट्रीट व्ह्यूवद्वारे आम्ही हा फोटो जेथून काढला असेल त्या जागेवर गेलो. खाली दिलेल्या एम्बेडेड मॅपमध्ये तुम्ही स्पष्ट पाहू शकता की, हा महामार्ग भारतातील नसून, पोर्तुगालमधील आहे.

निष्कर्ष

फेसबुक पोस्टमध्ये दाखवण्यात आलेला फोटो जम्मू-उधमपूर महामार्गाचा (एनएच-1) नसून, पोर्तुगालमधील फुंचाल शहरातील आहे. त्यामुळे ही पोस्ट असत्य आहे.

Avatar

Title:TRUE PICTURE: पोर्तुगालमधील महामार्गाचा फोटो भारतातील महामार्ग म्हणून व्हायरल

Fact Check By: Mayur Deokar 

Result: False