लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका क्लिपमध्ये प्रियांका चतुर्वेदी म्हणतात की, “मोदी ब्रँड महाराष्ट्रात चालणार नाही.”

तर प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या क्लिपमध्ये संजय राऊत म्हणतात की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींना 25 वर्षे कोणीही टक्कर देऊ शकत नाही.”

या व्हिडिओतून दावा केला जात आहे की, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नेत्यांमध्ये मतभेद आहे.

पडताळणीअंती कळाले की, संजय राऊत यांचे विधान 4 वर्षांपूर्वीचे आहे. तेव्हा शिवसेना आणि भाजप यांची युती होती.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमधील दोन्ही क्लिपमध्ये उबाठा पक्षातील नेत्यांचे वक्तव्य दाखवले आहेत. सोबतच हिंदीमध्ये व्हिडिओमध्ये लिहिले आहे की, “उबाठात ये क्या हो रहा है?”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

सर्वप्रथम आपल्याच पक्षाला विरोध करण्यासाठी आणि विरोधी पक्षाचे समर्थ करण्यासाठी संजय राऊत यांनी असे कोणतेही वक्तव्य़ सध्या केले असते, तर ही मोठी बातमी ठरली असती. परंतु, सध्याच्या घडीला संजय राऊत यांनी असे व्यक्तव्य केल्याची कोणतीही बातमी माध्यमांमध्ये आढळली नाही.

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केल्याच्या व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे.

एशियन न्यूज इंटरनेशनल युट्यूब चॅनलने 24 मे 2019 रोजी हा व्हिडिओ अपलोड केला होता. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “पुढील 25 वर्षे पंतप्रधान मोदींचा मुकाबला कोणी करू शकत नाही : संजय राऊत.”

अर्थात संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींची केलेली स्तुती सध्याची नाही.

https://youtu.be/0wQyPAIICAI?si=I9e-l1PWlF-ITudh

अर्काइव्ह

एशियन न्यूज इंटरनेशनलच्या बातमीनुसार ‘संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शानदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक केले.’ अधिक महिती अपण येथे वाचू शकता.

शिवसेना (विभाजन होण्यापूर्वीची) आणि भाजप या पक्षांनी युती करत 2019 मधील लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली होती.

प्रियांका चतुर्वेदी

एबीपी न्यूजला मुलाखत देताना प्रियांका चतुर्वेदी एनडीएवर युतीवर निशाणा साधताना म्हणतात की, “महाराष्ट्रात ‘मोदी’ हा ब्रँड नसून ‘ठाकरे’ हा ब्रँड चालतो हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे एनडीए नेत्यांना ‘ठाकरे’ आडनाव घ्यायचे असले तर त्यांनी भाजपच्या पक्ष चिन्हावर निवडणूक लढवावी” संपूर्ण बातमी येथे वाचू शकता.

https://youtu.be/K16sVavKb7M?si=3avxTrwGoUIMW3jW&t=375

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा आहे. संजय राऊत आपल्याच पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांच्या वक्तव्यचे विरोध करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्तुती केले नाही. चुकीच्या दाव्यासह जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Avatar

Title:संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करतानाचा व्हिडिओ 4 वर्षांपूर्वीचा; वाचा सत्य

Written By: Sagar Rawate

Result: Misleading