
महाराष्ट्रातून देवभूमी अशी ओळख असणाऱ्या उत्तराखंड या राज्यातील केदारनाथ मंदिरात दरवर्षी लाखो भाविक जात असतात. समाजमाध्यमात सध्या केदारनाथ येथे मोठी बर्फवृष्टी होत असून तेथील मंदिर बर्फाखाली असल्याची माहिती देणारा एक व्हिडिओ पसरत आहे. कोल्हापूर श्री महालक्ष्मी टूडे दर्शन, जयेश काळे, अनुशा बारापात्रे आणि मंगल मेंहदळे आदींनीही असाच व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामुळे काही जण चिंतीत तर काही जण आनंदित आहेत. हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे, याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडो केली आहे.
तथ्य पडताळणी
केदारनाथ येथील केदारनाथ मंदिर परिसरात खरोखरच बर्फवृष्टी होत आहे का याचा आम्ही सर्वप्रथम शोध घेतला. त्यावेळी दैनिक सामनाच्या संकेतस्थळाने 27 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेले एक वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार मंदिर परिसरात सध्या बर्फाची चादर पसरलेली आहे. समाजमाध्यमात पसरत असलेला व्हिडिओ मात्र आम्हाला याठिकाणी दिसून आला नाही. त्यामुळे आम्ही आमचा शोध आणखी पुढे नेला. त्यावेळी आम्हाला अमर उजाला या हिंदी संकेतस्थळाने 3 मार्च 2019 रोजी दिलेले वृत्त दिसून आले. या वृत्तानुसार त्यावेळी केदारनाथ मंदिर हे 14 फुट बर्फाखाली होते.
त्यानंतर युटूयूबवरही आम्ही याबाबत काही माहिती मिळते का हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला हरिद्वार लाईव्ह या युटूयूबवर चॅनलवर 26 मार्च 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला दिसून आला. त्यावर हिंदीत शीर्षक देण्यात आले आहे. आपण हा व्हिडिओ खाली पाहू शकता.
निष्कर्ष
केदारनाथ मंदिर परिसरात दरवर्षी हिवाळ्यात हिमवृष्टी होते. सध्याही अशी हिमवृष्टी सुरू आहे. समाजमाध्यमात पसरत असलेला हा व्हिडिओ केदारनाथ मंदिर परिसरातीलच जुना म्हणजेच मार्च 2019 मधील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट अर्धसत्य स्वरुपाची आढळली आहे.

Title:Fact : देवभूमी उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे हे दृश्य नेमके कधीचे?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: Partly False
