
उत्तर प्रदेशमधील माजी खासदार व कुख्यात गँगस्टर अतीक अहमदचा मुलगा असद अहमद गेल्या आठवड्यात पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. त्यानंतर असदच्या अंत्ययात्रेला जमलेल्या विराट गर्दीचा व्हिडिओ म्हणून एक क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.
पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडियो असदच्या अंत्ययात्रेचा नसून मौलाना सय्यद मुहम्मद राबे हसनी नदवी यांच्या अंतयात्रेला ही गर्दी लोटली होती. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे दावा ?
अंतयात्रेच्या व्हिडिओसोबत युजर्स लिहितात की, “अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमदच्या अंत्यसंस्कारात लोकांची गर्दी!”
मुळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज द्वारे सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ ‘ट्रॅप द एजुकेशन’ या युट्यूब चॅनलने 13 एप्रिल 2023 रोजी अपलोड केला होता.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उर्दू भाषेत लिहिलेले आहे की, “हजरत मौलाना सय्यद मुहम्मद राबे हसनी नदवी यांची अंत्ययात्रा”
हा धागा पकडून अधिक माहिती मिळवल्यावर कळाले की, 13 एप्रिल 2023 रोजी लखनौ येथीस नदवा मदरशामध्ये मौलाना सय्यद मुहम्मद राबे हसनी नदवी यांचा अजाराने मृत्यू झाला होता. ते 2002 मध्ये ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे (AIMPLB) अध्यक्ष होते.
नदवा मदरसाचे पूर्ण नाव दारुल उलूम नदवातुल उलेमा आहे. या ठिकाणी जगभरातून मुस्लिम विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात.
मदरसा प्रशासनाने फॅक्ट क्रेसेंडोला सांगितले की, व्हायरल व्हिडिओ मौलाना राबे हसनी नदवी यांच्या अंत्यसंस्काराचा आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर देखील अपलोड केला होता.
मौलाना राबे हसनी नदवी अंत्यसंस्काराचे इतर व्हिडिओ आपण इथे पाहू शकतात.
खालील तुलनात्मक फोटोमध्ये व्हिडिओचे स्क्रीनशॉट दिलेले आहेत. लक्षपूर्वक पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, दोन्ही फ्रेममध्ये एक इमारत आणि एका व्यक्तीच्या खांद्यावर लाल रंगाचा कपडा दिसेल. यावरून दोन्ही व्हिडिओ एकच असल्याचे कळते.

असद अहमद
चकमकीत मारला गेल्यानंतर असद अहमदला 15 एप्रिल रोजी प्रयागराजच्या कसारी मसारी कब्रिस्तानमध्ये दफन करण्यात आले. या ठिकाणी बंदोबस्तला 200 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होत की, व्हायरल व्हिडियो असद अहमदच्या अंत्ययात्रेचा नाही. ही गर्दी मौलाना सय्यद मुहम्मद राबे हसनी नदवी यांच्या अंतयात्रेची आहे. चुकीच्या दाव्यासह व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)

Title:हा व्हिडिओ अतीक अहमदच्या मुलाच्या अंतयात्रेचा नाही; वाचा सत्य
Fact Check By: Sagar RawateResult: Misleading
