कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे मतदान 10 मे रोजी पार पडले. तत्पूर्वी कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान “मोदी हटओ, देश बचाओ” असा संदेश देणारी जाहिरात व्हायरल झाली. दावा केला जात आहे की, कर्नाटकमध्ये विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात ही जाहिरात तयार केली.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताणळीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ बनावट आहे. एका टायर्स कंपनीच्या जाहिरातीला छेडछाड करुन हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल जाहिरातीच्या शेवटी “मोदी हटवा, पैसे वाचवा, नोकरी वाचवा, मुली वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा” असे लिहिलेले होते.

युजर्स व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “कर्नाटक निवडणुक मधील जाहिरात.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, सीएट टायर्स कंपनीने आपल्या अधिकृत युट्यूब चॅनवर ही जाहिरात 8 जून 2017 रोजी अपलोड केली होती. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेले आहे की, हि ‘सीएट फ्यूल स्मार्ट टायर्स’ची जाहिरात आहे.

https://youtu.be/vI4W01DG5Co

सदरील संपूर्ण जाहिरात पाहिल्यावर लक्षात येते की, व्हायरल व्हिडिओ प्रमाणे “मोदी हटवा, पैसे वाचवा, नोकरी वाचवा, मुली वाचवा, लोकशाही वाचवा, देश वाचवा” असे या जाहिरातीत लिहिलेले नाही. त्या जागी ‘सीएट टायर्स’ लिहिलेले आहे.

व्हायरल आणि मूळ दोन्ही व्हिडिओ तुलना केल्यावर आपल्या लक्षात येईल की, व्हायरल व्हिडिओ एडिट केला असून कर्नाटक विधानसभा निवडणूकसोबत जोडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने व्हायरल होत आहे.

https://youtu.be/a8_1RSacDeY

या आधीदेखील व्हीआयपी बॅग्स कंपनीने ‘लव जिहाद’ला प्रोत्साहन देणारी जाहिरात प्रदर्शीत केली, या दाव्यासह एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

परंतु, तो व्हिडिओदेखील बनावट आढळला. व्हीआयपी बॅग्स कंपनीने अशी कोणती ही जाहिरात प्रदर्शीत केलेली नव्हती. सदरील फॅक्ट-चेक आपण येथे वाचू शकतात.

निष्कर्ष

यावरुन सिद्ध होते की, व्हायरल जाहिरात बनावट आहे. सीएट टायर्स कंपनीच्या मूळ जाहिराती जाहिरातीशी छेडछाड करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात शेअर केले जात आहे.

(तुमच्याकडेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर त्यांची सत्यता जाणून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. आमचे लेटेस्ट फॅक्ट-चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर वर फॉलो करा.)

Avatar

Title:कर्नाटकमध्ये “मोदी हटओ, देश बचाओ” अशी बनावट जाहिरात व्हायरल; वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Altered