दुबई एअरपोर्टवर इराणीचा हल्ल्या म्हणून; अजमान मार्केट आगीचा जुना व्हिडिओ व्हायरल 

False राजकीय | Political

मिडल ईस्टमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी भीषण आग लागलेली दिसते. एका इमारतीमधून मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि धूर निघताना दिसतो.

दावा केला जात आहे की, “हा दुबई इंटरनॅशनल एअरपोर्टचा व्हिडिओ आहे, जिथे इराणने ड्रोन हल्ला दर्शवतो.”

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 5 वर्षांपूर्वीचा आहे.

काय आहे दावा ?

व्हायरल व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला असलेल्या एका इमारतीमधून मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि धूर निघताना दिसतो.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “इराण दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन पाडत आहे.”

मूळ पोस्ट – फेसबुक  | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर  कळाले की, व्हायरल व्हिडिओ गेल्या पाच वर्षांपासून सोशल मीडियावर उपलब्ध आहे. 

“फादी निमेर” नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ 6 ऑगस्ट 2020 रोजी अपलोड केल्याचे आढळले.

सोबत दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ संयुक्त अरब अमिरातमधील अजमान शहरातील मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीचा आहे.

पुढे “एल युनिव्हर्सल” या स्पॅनिश यूट्यूब चॅनेलवरही 6 ऑगस्ट 2020 रोजी याच घटनेचा व्हिडिओ अपलोड केलेला आढळला, ज्यामध्येदेखील ही आग अजमान मार्केटमधील असल्याचे स्पष्ट केले आहे.

तसेच, “सीजीटीएन” च्या ट्विटर हँडलवर 6 ऑगस्ट 2020 रोजी शेअर केलेल्या पोस्टनुसार, अजमानच्या औद्योगिक क्षेत्रातील पब्लिक मार्केटमध्ये मोठी आग लागली होती.

बीबीसीच्या बातमीनुसार, ही आग संध्याकाळी सुमारे 6:30 वाजता लागली होती आणि हे ठिकाण दुबईपासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे.

तसेच गल्फ न्यूजच्या रिपोर्टनुसार, अजमान सिव्हिल डिफेन्सने या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत केली होती.

निष्कर्ष

यावरूनस्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओ दुबई एअरपोर्टवरील कोणत्याही हल्ल्याचा नाही. मुळात हा 2020 मध्ये अजमान शहरातील मार्केटमध्ये लागलेल्या आगीचा जुना व्हिडिओ आहे. खोट्या दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्याव्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोलाफेसबुक,इन्स्टाग्रामट्विटरयेथे फॉलो करा.)

Result Stamp

Title: दुबई एअरपोर्टवर इराणीचा हल्ल्या म्हणून; अजमान मार्केट आगीचा जुना व्हिडिओ व्हायरल 

Fact Check By: Sagar Rawate

Result: False


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *