मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर आईने गोळ्या झाडल्याचा हा व्हिडिओ चित्रपटातील आहे; वाचा सत्य
सध्या महिलांवरी अनेक घटना समोर येत असताना आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयातच आरोपीला गोळी घालतानाचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे.
दावा केला जात आहे की, एका जर्मन महिलेने तिच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला कोर्टातच गोळ्या घातल्याचा हा व्हिडिओ आहे.
पडताळणीअंती कळाले की, हा व्हिडिओ एका चित्रपटातील सीन आहे.
काय आहे दावा ?
व्हायरल व्हिडिओमध्ये एक महिला गोळ्या झाडते आणि काही लोक तिला पकडतात.
युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “हीच ती शूर जर्मन महिला मारियान बाचमेयर, जिने आपल्या 7 वर्षांच्या निष्पाप मुलीवर बलात्कार करणाऱ्याला कोर्टात गोळ्या घातल्या. त्यानंतर तीला 6 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.”
मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह
तथ्य पडताळणी
रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ एका जुन्या चित्रपटामधील क्लिप आहे.
एका युट्यूब चॅनलवर 17 ऑक्टोबर 2014 रोजी हा चित्रपट अपलोड केला होता. कॅप्शनमध्ये 'नो टाईम फॉर टीयर्स: द बॅचमियर केस' असे लिहिले होते.
खालील व्हिडिओमध्ये 1:19:30 मिनिटावर व्हायरल व्हिडिओमधील त्याच महिलेला गोळ्या झाडताना पाहू शकतो.
अधिक सर्च केल्यावर व्हायरल व्हिडिओदेखील आढळला.
सदरील महितीच्या आधारे अधिक सर्च केलावर कळाले की, 'नो टाईम फॉर टीयर्स: द बॅचमियर केस' हा चित्रपट 1984 साली प्रदर्शित झाला असून हा सत्य घटनेवर आधारीत आहे.
मूळ पोस्ट – आयएमडीबी
या चित्रपटात मारियान बॅचमियरची भूमिका अभिनेत्री मैरी कोलबन यांनी साकारली होती.
मारियान बॅचमियर कोण आहे?
मारियान बॅचमियर ही जर्मन महिला आहे. मारियानने 6 मार्च 1981 रोजी तिच्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या केलेल्या क्लॉस ग्रॅबोव्स्कीला गोळ्या घालून ठार मारले होते. अधिक माहिती येथे वाचू शकता.
खालील तुलनात्मक फोटो पाहिल्यावर आपल्या व्हिडिओमधील मारियान बॅचमियर आणि तिची भूमिका साकारणारी अभिनेत्री मैरी कोलबन यांच्यातील फरक लक्षात येईल.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ 1984 सालच्या “नो टाइम फॉर टीयर्स: द बॅचमियर केस” या चित्रपटातून घेण्यात आला होता, जो याच घटनेवर आधारित होता. तसेच व्हिडिओमधील महिला मारियान बॅचमियर नसून तिची भूमिका साकारणारी अभिनेत्री मैरी कोलबन आहे. भ्रामक दाव्यासह हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्राम व ट्विटर येथे फॉलो करा.)
.container {
border: 2px solid #000;
background-color: #eee;
border-radius: 5px;
padding: 16px;
margin: 16px 0
}
.container::after {
content: "";
clear: both;
display: table;
}
.container img {
float: left;
margin-right: 20px;
border-radius: 50%;
}
.container span {
font-size: 20px;
margin-right: 15px;
}
@media (max-width: 500px) {
.container {
text-align: center;
}
.container img {
margin: auto;
float: none;
display: block;
}
}
Title:मुलीवर बलात्कार करणाऱ्यावर आईने गोळ्या झाडल्याचा हा व्हिडिओ चित्रपटातील आहे; वाचा सत्य
Written By: Sagar Rawate
Result: Partly False