चीनमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पडकतानाचा हा व्हिडियो नाही. ही केवळ मॉक ड्रॉल होती.

Coronavirus False वैद्यकीय

चीनसह जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचे आता भारतातही आगमन झाले आहे. या विषाणूसंबंधी विविध दाव्यासह व्हिडियो व्हायरल होत आहेत. अशाचा एका व्हिडियोमध्ये गणवेशधारी पोलिस कारमधील एका व्यक्तीला बाहेर काढून त्याची तपासणी करताना दिसतात. चीन सरकार अशाप्रकारे कोरोनाबाधित नागरिकांना पकडत असल्याचा दावा या व्हिडियोसबत केला जात आहे. फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हा दावा चुकीचा आढळला.

तथ्य पडताळणी

टोलनाक्यावर एका कारला पोलिस थांबवतात. एक व्यक्ती त्यातून बाहेर येतो. त्यावर पोलिस जंतूनाशक औषध शिंपडतात. सोबत कॅप्शनमध्ये युजरने म्हटले की, “कोरोनाचे पेशंट चीनमध्ये कसे पकडतात बघा! कायद्याची अमंलबजावनी काटेकोरपणे केली जाते.”

मूळ व्हिडियो येथे पाहा – फेसबुकफेसबुक 

तथ्य पडताळणी

व्हिडियोचे नीट निरीक्षण केल्यावर दिसते की, पोलिसांच्या हातातील एका फलकावर 反恐演 Exercises असे लिहिलेले आहे. त्याचे इंग्रजी भाषांतर Counter Terrorism Exercises असे होते. 

इनविड टूलच्या माध्यमातून व्हिडियोची की-फ्रेम मिळवली. तिला चीनमधील सर्च इंजिन बायडूवर रिव्हर्स इमेज सर्चे केले असता वॉशिंग्टन पोस्टची बिजिंग प्रमुख अ‍ॅना फायफिल्ड हिने हा व्हिडियो ट्विट केला होता. सोबत लिहिले की, हे केवळ चीनमध्येच होऊ शकते. तेथील मेडिकल स्वात टीम कोरोना व्हायरसबाधित लोकांना कुत्रे पकडण्याच्या जाळीने पकडत आहेत.

Bill Bishop नावाच्या अकाउंटनेदेखील हा व्हिडियो शेयर करीत म्हटले की, कोरोना व्हायरसच्या रुग्णांना पकडण्याची ही मॉक ड्रील आहे.

https://twitter.com/niubi/status/1231045572737540098

यानंतर गुगलवर की-वर्ड्सद्वारे सर्च केले असते, द टेलिग्राफ न्यूजपेपरने हा व्हिडियो युट्यूबवर शेयर केला होता. व्हिडियोच्या शीर्षकानुसार, Coronavirus: ‘SWAT’ team tackle man in training exercise. (स्वात टीमचे प्रशिक्षण व्हिडियो). सोबत दिलेल्या माहितीनुसार, हेनान प्रांतातील टोंगबाई येथे कोरोनो व्हायरसच्या रुग्णांना शोधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. 

स्काय न्यूज आणि ग्लोबल न्यूज वेबसाईवटरील 24 फेब्रुवारी 2020 रोजीच्या बातमीनुसारदेखील स्वात टीमची ही मॉक ड्रील होती. त्यांनी काही करोना व्हायरसग्रस्त नागरिकाला पकडले नव्हते. कोरोनाबाधित रुग्ण जर मदत करण्यास नकार देत असेल तर त्याला पकडायचे कसे याची ही ट्रेनिंग होती.

चीनमधील सोशल मीडिया साईट विबोवर टोंगबाई येथील सुरक्षा प्रशासनाच्या अधिकृत अकाउंटद्वारे हा व्हिडियो शेयर केला होता. त्यानुसार, कोरोनाच्या प्रसार रोखण्यासाठी टोंगबाई पोलिसांनी सशस्त्र प्रशिक्षण घेतले. 

निष्कर्ष

यावरून स्पष्ट होते की, हा व्हिडियो कोरोना व्हायरसनेबाधित रुग्णाला पकडण्याचा नाही. हा केवळ मॉक ड्रील व्हिडियो आहे. कोरोनाबाधित रुग्ण जर मदत करण्यास नकार देत असेल तर त्याला पकडायचे कसे याची ही ट्रेनिंग होती.

Avatar

Title:चीनमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण पडकतानाचा हा व्हिडियो नाही. ही केवळ मॉक ड्रॉल होती.

Fact Check By: Agastya Deokar 

Result: False