
लोकसभा 2019 निवडणूकीनंतर नवीन मंत्रीमंडळाची स्थापना झाली. त्यावेळी नवीन मंत्रीमंडळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले या पक्षाचे नेते रामदास आठवले यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश झाला. त्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये रिपाई-ए या पक्षाचा एकही नगरसेवक नाही असा दावा केला आहे. फॅक्ट क्रिसेंडोने याविषयी केली सत्य पडताळणी.
सत्य पडताळणी
सोशल मीडियावर असणाऱ्या पोस्टमध्ये केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पक्षाचा म्हणजेच आरपीआय-ए या पक्षाचा एकही नगरसेवक पदावर नाही असा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये रामदास आठवले यांच्या आरपीआय पक्षाचा एकही नगरसेवक नाही, एकही जिल्हापरिषद सदस्य नाही, एकही आमदार नाही, एकही खासदार नाही असे म्हटले आहे.
या पोस्टबद्दल सत्य जाणून घेण्यासाठी सर्वात प्रथम आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आठवले या पक्षाचा नगरसेवक कोणकोणत्या महानगरपालिकेमध्ये आहे हे गुगलवर शोधले. त्यानंतर 2017 मध्ये झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणूकामध्ये रिपाई-ए या पक्षाचे नगरसेवक आहेत असे आढळून आले. याविषयी दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये बातमी प्रसिद्ध झाली आहे.
रिपाई-ए पक्षाचे नगरसेवक किती महानगरपालिकांमध्ये आहे?
या बातमीनुसार ठाणे महानगरपालिकामध्ये रिपाई-ए या पक्षाचा एक नगरसेवक सदस्य आहेत. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण नगरसेवक येथे क्लिक केल्यानंतर आपणांस सर्व नगरसेवक सदस्यांची यादी दिसते. या यादीमध्ये आपणासं रिपाई-ए पक्षाचे नगरसेवकाचे
अमरावती महानगरपालिका येथेही रिपाई-ए या पक्षाचा नगरसेवक आहे. अमरावती महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर आपण नगरसेवक येथे क्लिक केल्यानंतर आपणांस सर्व नगरसेवक सदस्यांची यादी दिसते. या यादीमध्ये रिपाई-ए या पक्षाचे प्रकाश बनसोड हे नगरसेवक सध्या विद्यमान आहेत. यासंदर्भात प्रकाश बनसोड यांच्याशी फॅक्ट क्रिसेंडो टीमने फोनवर संपर्क केला. त्यानंतर त्यांनी स्वतः त्यांनी रामदास आठवले गटाच्या रिपाई-ए पक्षाकडून पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडूण आलेले आहेत असे त्यांनी सांगितले.
अमरावती महानगर पालिका । अर्काईव्ह
त्यामुळे रिपाई-ए या पक्षाचा एकही नगरसेवक नाही हा पोस्टमधील दावा असत्य ठरतो.
रिपाई-ए पक्षाचा जिल्हापरिषद सदस्य आहे का?
अमरावती जिल्हापरिषदेमध्ये रिपाई-ए या पक्षाचा एक जिल्हापरिषद सदस्य आहे. यासंदर्भात एबीपी माझा या न्यूज पोर्टलवर बातमी प्रसिद्ध झालेली आहे.
निष्कर्ष : संपुर्ण संशोधनानंतर असे आढळून आले की, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपाई-ए पक्षाचा नगरसेवक आणि जिल्हापरिषद सदस्य देखील आहे. त्यामुळे पोस्टमध्ये नमूद करण्यात आलेला रिपाई-ए पक्षाचा एकही नगरसेवक नाही हा दावा असत्य आहे.
