काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये पंतप्रधान शपथविधी पार पडला. या पार्श्वभूमीवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये नरोधा मालिनी साहिबा नामक महिला पाकिस्तानमध्ये गायत्री मंत्र सादर करते. दावा केला जात आहे की, पाकिस्तानमध्ये नुकतेच पंतप्रधानांच्या शपथविधीमध्ये गायत्री मंत्र सादर करण्यात आले.

फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी हा व्हिडिओ आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकावर (9049053770) पाठवून फॅक्ट-चेक करण्याची विनंती केली.

पडताळणीअंती कळाले की, व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभातील नाही.

काय आहे दावा ?

या व्हिडिओमध्ये नरोधा मालिनी साहिबा म्हणतात की, मी होळीच्या सर्वांना शुभेच्छा देते आणि पाकिस्ताचे पंतप्रधान ‘वजीर-ए-आझम’ यांच्या समोर गायत्री मंत्र सादर करते.

युजर्स हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहितात की, “पाकिस्तान पंतप्रधानांचा शपथविधी समारंभ "गायत्री महा मंत्र" ने सुरू होत आहे. श्रीमती नरोदा मालिनी साहिबा आता पाकिस्तानने त्याचे महत्त्व अधिकृतपणे ओळखले आहे आणि सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचे पठण केले जाते.”

मूळ पोस्ट – फेसबुक | आर्काइव्ह

तथ्य पडताळणी

कीव्हड सर्च केल्यावर कळाले की, व्हायरल व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ 6 वर्षांपूर्वीचा असून पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभातील नाही.

इंडिया न्यूज नॅशनलने 17 मार्च 2017 रोजी हाच व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, "पाकिस्तान: होळीच्या उत्सवात नवाझ शरीफ यांच्या उपस्थितीत गायत्री मंत्र गायला गेला."

https://youtu.be/NBr9aIvVIR0?si=7nSOgt9leBfEC7H3

पुढे आधिक सर्च केल्यावर कळाले की, बीबीसीने 21 मार्च 2017 रोजी पाकीस्तानमध्ये गायत्री मंत्र सादर करणाऱ्या गायिका नरोधा मालिनी यांची मुलाखत घेतली होती. मुलाखातपूर्वी देखील हाच व्हिडिओ दाखवण्यात आला होता.

https://youtu.be/xhfoaEAUTEI?si=6pOVJ8LlS3E6IXGB

पाकिस्तान पंतप्रधान शपथविधी समारंभ

पाकिस्तानमध्ये काही दिवसांपूर्वी सार्वत्रिक निवडणुका संपन्न झाल्यानंतर त्रिशंकू परिस्थिती उद्भवली होती. एकाही पक्षाला बहुमत सिद्ध करता आले नव्हते. सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लीम लिग-नवाझ (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पिपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात एकमत झाल्यानंतर पंतप्रधानपदी शाहबाज शरीफ निवड करण्यात आली. अधिक माहिती येथे वाचू शकता.

समान टीव्हीने पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या शपथविधी समारंभाचे थेट प्रक्षेपण केले होते. खालील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की, या समारंभादरम्यान कुठे ही गायत्री मंत्र सादर करण्यात आले नाही.

https://www.youtube.com/live/328c5W2abPs?si=oSkhrRcKKqZFnALv

निष्कर्ष

यावरून सिद्ध होते की, व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभातील नाही. भ्रामक दाव्यासह 6 जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे.

(तुमच्याकडेदेखील काही संशयास्पद मेसेज, पोस्ट, फोटो, व्हिडिओ किंवा बातम्या असतील तर फॅक्ट चेक करून घेण्यासाठी त्या आमच्या व्हॉटसअॅप फॅक्टलाईन क्रमांकवर (9049053770) पाठवा. लेटेस्ट फॅक्ट चेक वाचण्यासाठी फॅक्ट क्रेसेंडोला फेसबुक, इन्स्टाग्रामट्विटर येथे फॉलो करा.)

Avatar

Title:पाकिस्तान पंतप्रधानांच्या शपथविधी समारंभात गायत्री मंत्र सादर करण्यात आले का ? वाचा सत्य

Fact Check By: Sagar Rawate

Result: Misleading