
कोविड-19 महारोगाच्या साथीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात भर म्हणून सोशल मीडियावर खोट्या आणि असत्यापीत माहितीचा भडिमार सुरू आहे. अशाच एका फेक मेसेजमध्ये दावा करण्यात आला की, औरंगाबाद शहरात रात्री कोरोना विषाणू मारण्याच्या औषधाची फवारणी करण्यात येणार असल्यामुळे नागरिकांनी रात्री 10 ते पहाटे 5 वाजेदरम्यान बाहेर न पडण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले.
फॅक्ट क्रेसेंडोच्या वाचकांनी व्हॉट्सअॅपवर (9049043487) या मेसेजची तपासणी करण्याची विनंती केली. पडताळणीअंती हा मेसेज खोटा असल्याचे निष्पन्न झाले.
काय आहे मेसेजमध्ये?

मूळ पोस्ट येथे पाहा – फेसबुक । फेसबुक । फेसबुक
तथ्य पडताळणी
औरंगाबाद महानगरपालिकेत आस्तिक कुमार पांडे आयुक्त आहेत. त्यांनी खरंच असा काही आदेश काढला आहे का याचा इंटरनेटवर शोध घेतला. औरंगाबाद महापालिकेच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्टिकरण देण्यात आले आहे.
“कोरोनाच्या औषध फवारणीसाठी रात्री दहा ते पहाटे पाचदरम्यान घराबाहेर न पडण्याचा तो मेसेज खोटा आहे. माझ्या नावे खोटा मेसेज पसरविण्यात येत आहे. कोणीही या मेसेजवर विश्वास ठेवू नये. जर मला आपल्याला काही संदेश द्यायचा असेल तर मी तो व्हिडियोद्वारे देईल. आपण सर्वांनी महापालिकेला सहकार्य करावे,” असे आस्तिककुमार पांडे यांनी लिहिले.
याबरोबरच सकाळ वर्तमानपत्राने दिलेली बातमी आढळली. यामध्ये आयुक्तांनी असा काही आदेश दिला नसल्याचे म्हटले आहे. आयुक्तांच्या नावे अफवा पसरविली जात असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

मूळ बातमी येथे वाचा – सकाळ
फॅक्ट क्रेसेंडोने औरंगाबाद महानगर पालिकेचे जनसंपर्क अधिकार तौफिक अहमद यांच्याशी संपर्क केला. त्यांनीदेखील औरंगाबाद महापालिका आयुक्तांच्या नावे खोटा मेसेज व्हायरल होत असल्याचे सांगतिले. “आयुक्तांनी असा कोणाताही आदेश दिलेला नसून, नागरिकांनी खात्री केल्याशिवाय मेसेज फॉरवर्ड करून नयेत,” असे आवाहन त्यांनी केले.
आता विविध शहरांच्या नावे हा मेसेज व्हायरल होत आहे. त्याची दखल घेत केंद्रीय पत्रसूचना कार्यलयाने ट्विट करून हा मेसेज खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.
निष्कर्ष
यावरून सिद्ध होते की, औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांनी कोरोनाच्या औषध फवारणीसाठी रात्री दहा ते पहाटे पाचदरम्यान घराबाहेर न पडण्याचा आदेश काढलेला नाही. तसे सांगणारा व्हायरल मेसेज फेक आहे. कोरोना व्हायरससंबंधी कोणतीही असत्यापीत माहिती शेयर करून नये.
कोरोना व्हायरस विषयी अधिक बातम्या येते वाचा;

Title:रात्री दहानंतर घराबाहेर न पडण्याचा तो मेसेज खोटा. मनपा आयुक्तांनी नाही दिला आदेश. वाचा सत्य
Fact Check By: Aavya RayResult: False
