
हे आपल्या मुंबई चे विमानतळ हो >>>बुजवा ,नाले ,मिठीनदी. पहा परिस्थिती ,दुनिया बगते. सुधारा आता तरी, अशी माहिती Rajiv A. Datta यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.
फेसबुक / Archive
तथ्य पडताळणी
मुंबईतील विमानतळाचा म्हणून पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, मुंबईचा आहे का हे शोधण्यासाठी आम्ही स्क्रीनशॉटस घेत यांडेक्स इमेज सर्चद्वारे याचा शोध घेतला. याच्या परिणामात आम्हाला ‘NewsinFlight‘ नावाचे एक संकेतस्थळ मिळाले. या संकेतस्थळावर हा व्हिडिओ मेक्सिको विमानतळावरचा असल्याचे म्हटले आहे. मुसळधार पावसाने मेक्सिको विमानतळावर पाणी साचल्याचे या व्हिडिओत म्हटले आहे. या वृत्तासोबतच एक अधिकृत ट्विटर हॅन्डलवरील ट्विटही जोडण्यात आले आहे. हे ट्विट आपल्याला त्यादिवशी मॅक्सिको विमानतळावर नेमकी काय स्थिती होती हे सांगते. याशिवाय अनेक माध्यमांनी याबाबत वृत्त दिल्याचे दिसून येते. या मुसळधार पावसानंतर 5 तासांनी मॅक्सिको विमानतळावरील विमानसेवा सुरु झाली होती.
या घटनेबद्दल अधिक माहिती आणि सविस्तर वृत्त वाचण्यासाठी आपण खालील लिंकवर क्लिक करु शकता.
NewsinFlightPost | ArchivedLink |
Tweet | ArchivedLink |
Aviation 24 | Archive Link |
Downvids | Archive Link |
Lopezdoriga | Archive Link |
AICM | Archive Link |
‘aviacionaldia’ द्वारे 31 ऑगस्ट 2017 रोजी देण्यात आलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मॅक्सिको विमानतळावरील 300 उड्डाणे आज रद्द करण्यात आली आहेत. सुमारे पाच तासानंतर या विमानतळावरील सेवा पुन्हा बहाल झाली.
मेक्सिकोतील ‘FORO’ या वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिले आहे.
वरील माहितीवरुन हे स्पष्ट होत आहे की, पाणी साचल्याची ही घटना मुंबईतील विमानतळावरील नाही. समाजमाध्यमांवर हा व्हिडिओ मुंबईप्रमाणे बंगळूरु, ह्यूस्टन या शहरातील असल्याचाही दावा करण्यात येत आहे. हे स्पष्ट आहे की हा व्हिडिओ 30 ऑगस्ट 2017 रोजी मॅक्सिको विमानतळावर घेण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ भारतातील नाही. हा व्हिडिओ मुंबईचा असल्याचा सांगत असत्य माहिती पसरविण्यात येत आहे.
निष्कर्ष
हा व्हिडिओ मुंबई विमानतळाचा नसून मॅक्सिको येथील आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:Fact Check : मुंबई विमानतळावर मुसळधार पावसाने असे पाणी साचले होते का?
Fact Check By: Ajinkya KhadseResult: False
