
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक छायाचित्र सध्या व्हायरल होत असून हे छायाचित्र फोटोशॉप केलेले बनावट असल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात येत आहे. या छायाचित्राची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.

तथ्य पडताळणी
राहुल गांधी यांचे हे छायाचित्र काँग्रेसने आपल्या ऑफिशल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेले आहे. आपण हे ट्विट् खालील लिंकवर पाहू शकता.
गरीबी पर वार होगा, सपना ये साकार होगा।
— Congress (@INCIndia) April 7, 2019
कांग्रेस सरकार में, सशक्त गरीब परिवार होगा।।#AbHogaNYAY pic.twitter.com/sBlf5ITnHY
अधिक शोध घेतला ही इमेज काँग्रेसच्याच ट्विटर अकाऊंटवरुन 8 डिसेंबर 2015 रोजी ट्विट केली असल्याचेही आपल्याला दिसून येते. पॉडिचरी येथे आलेल्या पुरानंतर राहुल गांधी यांनी त्या ठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी काढलेली ही छायाचित्रे आहेत. खाली दिलेल्या लिंकवर आपण ही सगळी छायाचित्रे पाहू शकता.
Snapshots from Rahul Gandhi’s visit to flood affected areas of Tamil Nadu & Puducherry, yesterday (2/4) pic.twitter.com/kA4Qq320D9
— Congress (@INCIndia) December 9, 2015
या छायाचित्रात आपण स्पष्ट पाहू शकता की या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एका व्यक्तीचा तो हात आहे. त्यामुळे हे छायाचित्र बनावट असल्याचे म्हणता येऊ शकत नाही.
दोन्ही फोटोंचा तुलनात्मक अभ्यास तुम्ही खाली पाहू शकता.

निष्कर्ष :
राहुल गांधींचे बनावट म्हणून व्हायरल होत असलेले हे छायाचित्र प्रत्यक्षात सत्य आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:सत्य पडताळणी : राहुल गांधींचे ते छायाचित्र खरंच फोटोशॉप केलेले आहे का?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
