Fact Check : धर्म परिवर्तनासाठी बिहारमधून महाराष्ट्रात मुले आणली जात आहेत का?

False सामाजिक

मदरशांसाठी करण्यात येत आहे मानव तस्करी, धर्म परिवर्तनासाठी बिहारमधून महाराष्ट्रात मुले आणली जात आहेत, मोहम्मद शाकिर हुसैन आणि अब्दुल रहीम हुसैन यांनी RPF ने पकडले, अशी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. जय शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने ही पोस्ट शेअर केली असून मुळ पोस्ट सचिन जीनवाल यांची आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.  

फेसबुक / Archive 

तथ्य पडताळणी 

मानवी तस्करीची अशी कोणती घटना महाराष्ट्रात घडली आहे का? घडली असल्यास त्याची महाराष्ट्रातील माध्यमांनी नोंद घेतली नाही का? असा प्रश्न आम्हाला पडला, त्यामुळे आम्ही मदरसों के लिए की जा रही है मानव तस्करी असे गुगलवर टाकले तेव्हा आम्हाला नई दुनिया या वृत्तपत्राच्या संकेतस्थळावरील एक वृत्त दिसून आले. या वृत्तात केवळ 13 मुलांची तस्करी केली जात असल्याचे म्हटले आहे. या वृत्तात खाली 27 जून रोजी घडलेल्या एका घटनेची माहिती देण्यात आली आहे. आपण ही माहिती खाली पाहू शकता. 

नई दुनिया / Archive

आरपीएफचे दुर्ग येथील प्रभारी  पुरुषोत्तम तिवारी यांनी या मुलांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात आल्याचे म्हटलेले आहे. त्यानंतर आम्ही मोहम्मद शाकीर हुसैन याच्या नावाने शोध घेतला असता दैनिक सकाळचे खालील वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात पोलिसांनी मानवी तस्करीचा संशय असला तरी आरोपीने आपण त्यांना शिक्षणासाठी नेत असल्याचे म्हटले आहे. 

सकाळ / Archive 

भास्कर डॉट कॉमनेही या घटनेचे वृत्त दिले आहे. या वृत्तात या मुलांना हाफिज म्हणजेच शिक्षक असल्याचा दावा करणारा मोहम्मद शाकिर हुसैन हा महाराष्ट्रातील बुलढाणा येथे घेऊन चालला होता, असे म्हटले आहे. या वृत्तात कुठेही या मुलांना धर्मातरासाठी नेण्यात येत होते, असे म्हटलेले नाही. 

भास्कर डॉट कॉम / Archive 

भास्करनेच 30 जून 2019 रोजी दुर्ग येथील घटनेचे वृत्त देताना या घटनेचा पुन्हा उल्लेख केलेला दिसून येतो. 

निष्कर्ष 

मानवी तस्करीच्या संशयावरुन पोलिसांनी मोहम्मद शाकीर हुसैन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपण शिक्षक असल्याचा दावा केला असून या मुलांना शिक्षणासाठी मदरशात नेत असल्याचे त्याने पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या मुलांची धर्मांतरासाठी तस्करी करण्यात येत असल्याचे मात्र पोलिसांनी कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे या पोस्टमध्ये करण्यात येत असलेला धर्मांतरासाठीचा दावा फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत असत्य आढळला आहे.

Avatar

Title:Fact Check : धर्म परिवर्तनासाठी बिहारमधून महाराष्ट्रात मुले आणली जात आहेत का?

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False