Fact : नसीम खान यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा खोटा

False राजकीय | Political

ह्या xxxला पाकिस्तानात पाठवा , हरामखोर हिदुस्थानमध्ये राहतो व पाकिस्तान जिंदाबाद बोलतोय हा तर चक्क देशद्रोही आहे चांदिवली मतदार संघातील मतदार बंधु भगिनींनो येणार्या 21 तारखेला ह्याला ह्याची लायकी दाखवुन द्या . भारत माता की जय , भारत माता की जय , भारत माता की जय , वंदे मातरम , वंदे मातरम , वंदे मातरम, अशी माहिती देत Ravindra Bansode यांनी एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ देखील देण्यात आला आहे. काँग्रेसचे आमदार नसीम खान हे या व्हिडिओमध्ये भाषण करताना आणि पाकिस्तान झिंदाबादची घोषणा देताना दिसत आहेत. नसीम खान यांनी खरोखरच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या का? या व्हिडिओचे नेमके तथ्य काय आहे, याची पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे. 

फेसबुकवर मुळ पोस्ट / Archive

तथ्य पडताळणी  

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी असे भाषण केले आहे का, केले असल्यास ते त्यावेळी नेमके काय म्हणाले, हे भाषण महाराष्ट्र विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या वेळेचे आहे की जुने आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ नीट पाहिला. त्यावेळी आम्हाला या व्हिडिओच्या एका कोपऱ्यात मुशायरा मीडिया असे लिहिलेले दिसून आले. आम्ही युटूयबवर हा चॅनल शोधला असता त्यावर बरेच व्हिडिओ दिसून आले. त्यातील 20 जून 2016 रोजीच्या एका मुशायऱ्याच्या कार्यक्रमाच्या व्हिडिओत नसीम खान हे बोलताना दिसत आहे. या व्हिडिओत नसीम खान हे 2 तास 36 मिनिटांपासून आपल्या भाषणाला सुरुवात करतात. भाषणात 2 तास 41 मिनिटे 24 सेकंदाला ते म्हणतात, मै पुछना चाहता हूं मोदी जी से आज यमुना के किनारे दिल्ली में श्री श्री रवीशंकरने पाकिस्तान झिंदाबाद लगाया वो राजनाथ सिंहजी के मौजुदगी में. उनपे देशद्रोह का मुकदमा चलेगा या नही. अगर हिम्मत है मोदीजी के अंदर राजनाथने अपने मॉ का दुध पिया है तो देशद्रोह का मुकदमा चला के दिखाये तो नसीम खान कहेगा नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह इस देश के सच्चे भक्त है 

त्यानंतरही नसीम खान यांनी अनेक राजकीय आरोप केल्याचे आपण या व्हिडिओत पाहू शकतो. 

या संशोधनातून ही बाब स्पष्ट होत आहे की, नसीम खान यांनी स्वत: पाकिस्तान झिंदाबादचा असा कोणताही नारा लावलेला नाही. त्यांनी केवळ श्री श्री रविशंकर यांनी दिल्लीत पाकिस्तान झिंदाबादचा नारा लावला होता याचा उल्लेख केला होता. श्री श्री रविशंकर यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालविणार का नाही, असा प्रश्न उपस्थित करत मोदी आणि राजनाथ सिंह यांनी श्री श्री रविशंकर यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवून दाखवावा असे आव्हान ते देतात. 

यातील काही भाग कापून व्हायरल होत असलेला व्हिडिओ बनविण्यात आलेला आहे. खोट्या दाव्यासह तो समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. काँगेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही हा व्हिडिओ खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

निष्कर्ष 

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी पाकिस्तान झिंदाबादची कोणताही नारा दिलेला नाही. त्यांनी केवळ श्री श्री रविशंकर यांनी असा नारा दिल्याचे म्हटले होते. या व्हिडिओतील काही भाग काटछाट करुन चुकीच्या पध्दतीने आणि माहितीसह समाजमाध्यमात पसरविण्यात येत आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे. 

Avatar

Title:Fact : नसीम खान यांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा दावा खोटा

Fact Check By: Ajinkya Khadse 

Result: False