
सरकारी कर्मचाऱ्यांची मुले सरकारी शाळेतच शिकणार, असा निर्णय योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने घेतल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने याची तथ्य पडताळणी केली आहे. या पोस्टला 3 हजार 700 शेअर्स आहेत.

तथ्य पडताळणी
योगी आदित्यनाथ यांनी असा काही निर्णय घेतला आहे का, याची पडताळणी करताना आम्हाला द इंडियन एक्स्प्रेसचे एक वृत्त आम्हाला दिसून आले. या वृत्तात अलहाबाद उच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेत पाठवले पाहिजे असे मत व्यक्त केल्याचे वृत्त दिसून आले.

उत्तर प्रदेश सरकारच्या आणि उत्तर प्रदेश सरकारच्या शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरही आम्हाला याबाबत कोणतीही माहिती आढळून आली नाही. द पायोनियर या संकेतस्थळावर योगी आदित्यनाथ यांनी सर्व मुलांनी सरकारी शाळेतून शिक्षण घ्यावे, असे मत व्यक्त केल्याचे एक वृत्त आम्हाला दिसून आले.

योगी आदित्यनाथ यांनी मुजूरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी योग्य त्या सुविधा पुरवण्यात येतील असे, म्हटल्याचे वृत्त deccanchronicle.com ने दिले आहे. योगी आदित्यनाथ यांनी शिक्षणासंबंधी अनेक निर्णय घेतल्याचे दिसून येते. सरकारी कर्मचाऱ्यांची मुले सरकारी शाळेतच शिकतील असे निर्णय त्यांनी घेतल्याचे मात्र कुठेही दिसून येत नाही.

निष्कर्ष
योगी आदित्यनाथ यांनी सर्वांनी सरकारी शाळेतून शिक्षण घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अहलाहाबाद उच्च न्यायालयानेही सरकारी कर्मचाऱ्यांनी आपली मुले सरकारी शाळेतच पाठवावी, असे मत व्यक्त केले आहे. योगी आदित्यनाथ सरकारने असा निर्णय घेतल्याचे मात्र कुठेच दिसून येत नाही, त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत ही पोस्ट असत्य आढळली आहे.

Title:तथ्य पडताळणी : सरकारी कर्मचाऱ्यांची मुले सरकारी शाळेतच शिकणार: योगी सरकारचा निर्णय?
Fact Check By: Dattatray GholapResult: False
