सत्य पडताळणी : उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, हिंदू धर्म सगळ्यात हिंसक बनू लागला आहे?

Mixture राजकीय | Political

काँग्रेसमध्ये सामील झाल्यावर उर्मिला मातोंडकर यांनी हिंदू धर्म सगळ्यात हिंसक बनू लागला आहे, असे वक्तव्य केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फॅक्ट क्रेसेंडोने या पोस्टची तथ्य पडताळणी केली आहे.

आक्राईव्ह लिंक

तथ्य पडताळणी

उर्मिला मातोंडकर यांनी खरेच असे वक्तव्य केले आहे का, याचा शोध घेतला असता इंडिया टूडेच्या ट्विटर अकाउंटवर आम्हाला खालील व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओत त्या हिंदू धर्माच्या सहिष्णूतेवर आणि बंधुभावाबद्दल बोलल्या आहेत. त्यांनी हा सहिष्णू धर्म हा हळहळू सगळ्यात हिंसक धर्म बनू लागला आहे, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.   

उर्मिला मातोंडकर यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्याविरुध्द भाजपचे प्रवक्ते सुरेश नखवा यांनी तक्रार दिली आहे. उर्मिला मातोंडकर यांनी माझ्याविरोधात बोगस, निराधार आणि पूर्वग्रह ठेवून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाजपच्याच एका कार्यकर्त्याने ही तक्रार केलीय. भाजपच्या विचारसरणीला विरोध केल्यानेच ही तक्रार करण्यात आलीय, असे त्यांनी म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

दैनिक महाराष्ट्र टाईम्सनेही याबाबत आपल्या संकेतस्थळावर वृत्त दिले आहे. यात उर्मिला मातोंडकर यांनी आपण भाजपविरोधात बोलल्यानेच आपल्याविरोधात तक्रार देण्यात आल्याचे म्हटले आहे.

आक्राईव्ह लिंक

निष्कर्ष

उर्मिला मातोंडकर यांनी हिंदू धर्मातील सहिष्णूता देशातील बंधुभाव या विषयावर बोलतानाच गेल्या काही वर्षात हिंदू धर्म हा सगळ्यात हिंसक धर्म बनत चाललाय, असे म्हटले आहे. याबाबत पोलिसात तक्रार करण्यात आल्यानंतर त्यांनी आपल्यावर चुकीचे आरोप करण्यात आल्याचे म्हटले आहे. भाजप विचारसरणीला विरोध करण्यात आल्यानेच ही तक्रार करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे फॅक्ट क्रेसेंडोच्या पडताळणीत हे वृत्त संमिश्र आढळले आहे.

Avatar

Title:सत्य पडताळणी : उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, हिंदू धर्म सगळ्यात हिंसक बनू लागला आहे?

Fact Check By: Dattatray Gholap 

Result: Mixture